हेरगिरीच्या जगात आलिया-शर्वरीची धाडसी भूमिका 'अल्फा गर्ल्स'मध्ये

हेरगिरीच्या रोमांचक दुनियेत आलिया भट्ट आणि शर्वरी वाघचा 'अल्फा गर्ल्स'
Alia Bhatt and Sharvari Alpha film
Alia Bhatt-Sharvari Wagh Alia Bhatt-Sharvari Wagh Instagram

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची सुपरस्टार आलिया भट्ट आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फिमेल लीड चित्रपटाचे नेतृत्व करणार आहे. सोबतच, मुंज्या फेम शर्वरी वाघदेखील मुख्य भूमिकेत आहे. या दोघी सुपर-एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत. आदित्य चोप्रा या दोन्ही अभिनेत्रींना अल्फा गर्ल्स म्हणून सादर करीत आहेत.

Alia Bhatt and Sharvari Alpha film
मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’चे महाविजेते ठरले आकाश आणि सुरज मोरे
Summary

YRF, आलिया आणि शर्वरी यांनी या चित्रपटाचे टायटल समोर आणले. ‘अल्फा’ या चित्रपटातून या अभिनेत्री मोठ्या पडद्यावर मोठा धमाका करणार आहेत!

व्हिडिओमध्ये, आलिया भट्ट म्हणते, “ग्रीक अक्षरमालेतील पहिले अक्षर आणि आमच्या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य.. सर्वात पहिले, सर्वात वेगवान, सर्वात वीर. लक्षपूर्वक पाहा तर प्रत्येक शहरात एक जंगल आहे. आणि जंगलात नेहमीच राज्य करेल.. अल्फा!”

Alia Bhatt and Sharvari Alpha film
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत साकारणार खलनायिका

आदित्य चोप्रा त्यांच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फिमेल लीड चित्रपटाला ॲक्शन स्पेक्टेकल बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. ‘अल्फा’ च्या दिग्दर्शनाची धुरा शिव रावलच्या हाती आहे, ज्यांनी ‘द रेल्वे मॅन’ या ब्लॉकबस्टर ग्लोबल स्ट्रीमिंग सीरिजचे दिग्दर्शन केले होते, जी देखील YRF द्वारा निर्मित होती.

आतापर्यंत स्पाय युनिव्हर्सच्या सर्व चित्रपटांनी - ‘एक था टायगर,’ ‘टायगर जिंदा है,’ ‘वॉर,’ ‘पठाण,’ ‘टायगर ३’ - ब्लॉकबस्टर यश मिळवले आहे.

Alia Bhatt and Sharvari Alpha film
'तू भेटशी नव्याने’ : एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

आलिया-शरवरीचा ‘अल्फा’ हा आदित्य चोप्राचा पुढील मोठा चित्रपट आहे, जे सध्या ‘वॉर २’ देखील तयार करत आहेत ज्यामध्ये हृतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर प्रमुख भूमिकेत आहेत. या प्रसिद्ध ब्लॉकबस्टर युनिव्हर्समधील पुढील चित्रपट ‘पठाण २’ असेल, त्यानंतर ‘टायगर vs पठाण’ असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news