

गणेशोत्सवात एका व्हायरल व्हीडियोने अभिनेता अली गोनी चर्चेत आला आहे. अलीचा एक व्हीडियो व्हायरल झाला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, एका कार्यक्रमादरम्यान 'गणपती बाप्पा मोरया' न म्हटल्याने धमक्या मिळत असल्याचे त्याने सांगितले आहे.
याबाबत अधिक बोलताना तो म्हणतो, ‘आता अती झाले आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. माझे ईमेल आणि कमेंटबॉक्स धमक्यांनी भरून वाहत आहेत. (Latest Entertainment News)
लोक म्हणत आहेत माझ्यावर एफआयआर दाखल करा. कशासाठी? मी मुसलमान आहे म्हणून माझ्यावर आरोप केले जात आहेत. पण जे हिंदू गणपती बसवत नाहीत ते हिंदू नाहीत का?’
त्याने यावेळी गर्लफ्रेंड जॅस्मिन भसीनच्या कुटुंबाला यात ओढणाऱ्यानाही कडक शब्दात समाज दिली आहे. तो म्हणतो, ‘ हे जे धमकी किंवा जॅस्मिनला शिवीगाळ करणारे आहेत. त्यांच्यात एकात तरी हिम्मत असेल तर माझ्यासमोर यावे मी देवाशपथ त्यांना धडा शिकवेन. जर कोणी माझी आई, बहीण किंवा जॅस्मिनबाबत काहीही बोलले तर ते मी अजिबात सहन करणार नाही.’
तो पुढे सांगतो की, हा त्याचा पहिलाच गणपती उत्सव होता. मी जाणीवपूर्वक गणपतीबाप्पाची घोषणा देणे टाळले नाही. मी स्वत:च्या विचारात हरवलो होतो. मला कधीही वाटले नव्हते की हा एवढा मोठा मुद्दा बनेल. माझा धर्म मला नमाजच्या माध्यमातून प्रार्थना करण्याची अनुमति देतो.’
या दरम्यान जॅस्मिनचा आणि अलीचा एक व्हीडियो व्हायरल होतो आहे. यात जॅस्मिन दुबईच्या शेख जायेद मशिदीत बुरखा घालून गेली होती. या जुन्या क्लिपचा वापर करून अलीला पुन्हा ट्रोल केले गेले.
यावर तो म्हणतो, ‘जॅस्मिन माझ्यासोबत 4 वर्षे आहे. जर तिला योग्य वाटत नसेल तर मी तिला रोजा करण्यास सांगू शकत नाही. तिची मर्जी, तिचा धर्म आहे. मी तिला जबरदस्ती का करू? ती देखील मला या सगळ्यात जबरदस्ती करत नाहीत.