अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल : व्‍यापाऱ्यांच्‍या तावडीतून सुटकेसाठी अली काय करेल?

ali baba
ali baba
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोमांचक कथानक आणि आकर्षक व्हिज्‍युअल इफेक्‍ट्ससह सोनी सबवर नुकतीच सुरू झालेली मालिका 'अलिबाबा दास्‍तान-ए-काबुल'ला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व पाठिंबा मिळत आहे. अली व मरियममधील धमाल गंमतीजमती, ते एकत्र आल्‍यानंतर निर्माण करणारी जादू, सद्दामची मल्लिका-ए-तबाहीची इच्‍छा पूर्ण करण्‍याप्रती ओढ, सिमसिमची मरियमला आपल्‍या मुठीत घेण्‍याची इच्‍छा आणि पेंडंट शोधण्‍यासाठी ४० चोरांचा प्रयत्‍न अशा सर्व रोमांचक घटनांनी प्रेक्षकांचे मालिकेकडे लक्ष वेधून घेतले आहे.

अलिकडील एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना सिमसिमची तलीसमन (पेंडंट) असण्‍याची तीव्र इच्‍छा पाहायला मिळाली, ज्‍यामुळे तिचा इबलिस पुन्‍हा जिवंत होईल. ताबेदार व्‍यापारी मरियमचा शोध घेत आहेत आणि ४० चोर जुम्‍मा बाजारमध्‍ये पेंडंटचा शोध घेत आहेत. या गोंधळाच्‍या स्थितीमध्‍ये लोक घाबरून गेले आहेत.

दुसरीकडे अली व मरियम सुटका करून घेण्‍यामध्‍ये अयशस्‍वी होतात आणि ताबेदार व्‍यापारी त्‍यांना पकडतात. मरियम पकडली गेली असल्‍याची बातमी सद्दामला समजते, तर अली सुटका करून घेण्‍याची योजना आखू लागतो. अली मरियमला मधुर गाणे गाण्‍यास सांगतो, ज्‍यामुळे तो सुटका करून घेण्‍याच्‍या मार्गाबाबत विचार करू शकेल. अलीला एक उत्तम योजना सुचते.

अलीची योजना काय आहे?

शहजादी मरियमची भूमिका साकारणारी तुनिषा शर्मा म्‍हणाली, ''मरियम स्‍वत:चे जीवन वाचवण्‍याचा प्रयत्‍न करत आहे आणि तिच्‍या या प्रयत्‍नामध्‍ये अली नेहमी तिच्‍या मदतीस धावून येतो. एकत्र असताना ते जादू निर्माण करण्‍यासोबत गरजेच्‍या वेळी दुष्‍टांपासून स्‍वत:चे संरक्षण करतील याबाबत कोणतीच शंका नाही. मला खात्री आहे की, प्रेक्षक मरियमच्‍या जीवनात पुढे काय घडते आणि ती दुष्‍टांच्‍या तावडीतून कशाप्रकारे सुटका करून घेते हे पाहण्‍याचा आनंद घेतील.

आगामी एपिसोड्सबाबत सांगताना अलिबाबाची भूमिका साकारणारा शेहजान खान म्‍हणाला, ''अलीला गडद अंधाराप्रमाणे मरियमच्‍या जीवनावर असलेल्‍या संकटाबाबत माहित नाही. तो शेहजादीचा शोध घेऊन तिला शाहीसच्‍या हवाली करण्‍याच्‍या प्रवासावर आहे, ज्‍यामुळे त्‍याला पुरस्‍कार मिळू शकेल. दादीच्‍या अंदाजानुसार, अलीला दास्‍तान-ए-काबुल लिहिण्‍यासाठी त्‍याचा मुकद्दर मिळत राहिल. आगामी एपिसोड्स ड्रामा, अॅक्‍शन व धमालने भरलेले आहेत.''

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news