Aryan Khan | मी भाषण तोंडपाठ करून आलोय; शाहरुखच्या मुलाचा ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ व्हायरल

Aryan Khan | मी भाषण तोंडपाठ करून आलोय; शाहरुखच्या मुलाचा ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ व्हायरल
shahrukh khan gauri and Aryan Khan
Aryan Khan the Bads of Bollywood Preview Launch x account
Published on
Updated on

The Bads of Bollywood Preview Launch

मुंबई : शाहरुख खान-गौरी खान आर्यन खानची डेब्यू सीरीज द बॅड्स ऑफ बॉलीवूडमुळे चर्चेत आहे. या सीरीजमधून आर्यन खान दिग्दर्शक म्हणून डेब्यू करत आहे. यावेळी आर्यन खानने दिलेले भाषण चर्चेत आले आहे. नेटफ्लिक्सची सीरीज 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या प्रीव्ह्यू लॉन्चवेळी आर्यन खानने शाहरुखप्रमाणे कार्यक्रम सांभाळला. आर्यनने सांगितलं की, तो २ दिवसांपासून तयारी करत आहे.

Video- Rahil Mohammed | Pune SRKian & INC Voice x account वरून साभार

स्टेजवर काय म्हणाला आर्यन?

आर्यन स्टेजवर आल्यानंतर म्हणाला, 'आज मी खूप नर्व्हस आहे. आज मी पहिल्यांदा तुमच्यासमोर स्टेजवर आलोय. दोन दिवस आणि तीन रात्रींपासून मी सातत्याने भाषणाची तयारी करत आहे. खरंतर मी इतका निराश आहे की, मी टेलीप्राम्प्टरवर देखील लिहिलंय. आणि इथली लाईट गेली तरी मी कागदावर भाषण लिहून आणलंय...टॉर्च देखील आहे. आणि तरीपण माझ्याकडून जर काही चुकी झाली तर पापा हैं ना..आणि यानंतरही माझ्याकडून काही चूक झाली तर प्लीज मला माफ करा. कारण हे माझे पहिले भाषण आहे.'

आर्यन खानचा डेब्यू पाहून भावूक झाले शाहरुख-गौरी

शाहरुख खान आपल्या फॅमिलीसोबत ब्लॅक आऊटफिटमध्ये पोहोचले. ब्लॅक पँट, शर्ट, ब्लॅक कोट घालून किंग खान दिसला. आर्यन खानने स्टेजवर येताच सर्वात आधी हात जोडून अभिवादन केलं. आर्यनच्या मजेशीर भाषणाने सर्वांचं लक्ष वेधलं. तर काही मोमेंट असे दिसले की, शाहरुख खान - गौरी खान आपल्या मुलाला आर्यनला किस करताना दिसले. अनेक युजर्सनी कॉमेंट केलं की - ही एक फॅमिली नाही तर बॉलीवूड इंडस्ट्री आहे.

गौरी खानने असं काय केलं की खिळल्या सर्वांच्या नजरा

गौरी खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने लक्झरी ड्रेस परिधान केला होता, ज्याची किंमत ८ लाख ७३ हजार रुपये आहे. चॅनलचा इंद्रधनुषी कॉटन ट्विड जॅकेट (Chanel Spring-Summer 2025 iridescent cotton tweed jacket) तिने घातला होता. फ्लेयर्ड ब्लॅक चॅनल ट्राऊझर आणि क्लासिक प्लॅटफॉर्म हील्स घातले होते.

image of the bads of Bollywood poster
the bads of Bollywoodx account

कधी रिलीज होणार बॅड्स ऑफ बॉलिवूड

ही सीरीज नेटफ्लिक्सवर १८ सप्टेंबर, २०२५ रोजी स्ट्रीम होईल. याआधी सीरीजचा प्रिव्ह्यू मुंबईत ग्रँड स्टाईलमध्ये केलं गेलं.

अशा असतील कलाकारांच्या भूमिका

या सीरीजमध्ये साहेर बंबा देखील मुख्य भूमिकेत आहे. यावेळी तिने व्हाईट ऑफ शोल्डर व्हाईट कलर गाऊन परिधान केला होता. मोना सिंहने आसमान सिंहच्या आईची भूमिका साकारलीय. तर मनोज पहवा सीरीजमध्ये मोना सिंहचा पती आणि आसमान सिंहच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. राघव जुयाल मुख्य भूमिकेत आहे. बॉबी देओल अजय तलवारच्या भूमिकेत दिसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news