Akshaye Khanna Bhaagham Bhaag 2 | ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाच्या झोळीत मोठा सिनेमा, एकामागून एक मोठे प्रोजेक्ट्स रांगेत

Bhaagham Bhaag 2 | ब्लॉकबस्टर धुरंधरच्या यशानंतर अक्षयच्या झोळीत आणखी एक चित्रपट; खिलाडी कुमारसह मीनाक्षी चौधरीची प्रतीक्षा
akshay kumar - Akshaye Khanna
Akshaye Khanna joins akshay kumar Bhaagham Bhaag 2instagram
Published on
Updated on
Summary

‘धुरंधर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता त्याच्या झोळीत आणखी एक मोठा प्रोजेक्ट येणार असल्याची चर्चा असून, तो म्हणजे ‘भागम भाग 2’. या चित्रपटात खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारसोबत मीनाक्षी चौधरीही दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Akshaye Khanna Akshay Kumar Meenakshi Chaudhary Bhaagham Bhaag 2

धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाच्या झोळीत आणखी एक चित्रपट पडला आहे. ज्याचे शूटिंग फेब्रुवारीच्या २०२६ पासून सुरू होईल. अक्षय कुमार आणि मीनाक्षी चौधरी स्टारर चित्रपटात धुरंधरच्या रहमान डकैतची एन्ट्री झालीय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकप्रिय कॉमेडी चित्रपट ‘भागम भाग’चा सिक्वेल म्हणजेच ‘भागम भाग २’ लवकरच भेटीस येऊ शकतो. विशेष म्हणजे, या चित्रपटात खिलाडी कुमार अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार असून, अक्षय खन्नाही या सिक्वेलचा भाग आहे. जर अक्षय खन्नाची या चित्रपटात एन्ट्री झाली, तर हा सिक्वेल आणखी दमदार ठरेल. दरम्यान, अभिनेत्री मीनाक्षी चौधरीचेही नाव चित्रपटासाठी पुढे आले आहे.

भागम भाग हा अक्षय कुमारचा मूळचा चित्रपट २००६ मध्ये रिलीज धाला होता. या कॉमेडी थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केलं आहे. नीरज वोरा यांची कथा तर निर्माती सुनील शेट्टी - ढिलिन मेहता यांची आहे. चित्रपटात अक्षय कुमार , गोविंदा, परेश रावल यांच्या मुख्य भूमिका आहेत. लारा दत्ता , राजपाल यादव, जॅकी श्रॉफ, अरबाज खान, शक्ती कपूर , मनोज जोशी, रजाक खान, असरानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्याच्यासोबत मीनाक्षी चौधरीचीही एन्ट्री झाली आहे. 'ड्रीम गर्ल' हा ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपट बनवणारा तोच दिग्दर्शक हे चित्र बनवत आहे. राज शांडिल्य दिग्दर्शन करणार आहेत. अक्षय खन्नाकडे आधीच महाकाली चित्रपट आहे. ज्यामध्ये तो गुरु शुक्राचार्यांची भूमिका साकारत आहे.

akshay kumar - Akshaye Khanna
Avatar: Fire And Ash : रिलीजपूर्वीच ॲडव्हान्स बुकीगचा धुमाकूळ, सर्वात मोठा हॉलिवूड ओपनर ठरणार 'अवतार: फायर अँड ॲश'

दरम्यान, धुरंधर’ ने ८ व्या दिवशी वर्ल्डवाईड ३०० कोटी रुपयांची कमाई केलीय. दुसऱ्या आठवड्याच्या आधीच ८ व्या चित्रपटाने ३२ कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. पण रहमान डकैत बनून ज्याने बॉक्स ऑफिस गाजवले, तो अक्षय खन्ना त्याची स्टाईल सोशल मीडिया सेन्सेशन बनलीय.

akshay kumar - Akshaye Khanna
Flash Back 2025 | टॉप १० ब्लॉकबस्टर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उडवली धूळ! सिनेप्रेमी म्हणाले, 'हेच पसंत पडले'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news