image of Akshay Kumar
Akshay Kumar role in Daggubati Venkatesh South Blockbuster Remake Instagram

South Blockbuster Remake Akshay Kumar | वेंकटेश दग्गुबातीचा ब्लॉकबस्टर रिमेक; अक्षय कुमार लावणार ॲक्शन-कॉमेडीचा तडका

Daggubati Venkatesh South Blockbuster Remake Akshay Kumar | वेंकटेश दग्गुबातीचा ब्लॉकबस्टर रिमेक; अक्षय कुमार लावणार ॲक्शन-कॉमेडीचा तडका
Published on

Akshay Kumar To Star in South Blockbuster Remake

मुंबई : अक्षय कुमार आता वेंकटेश दग्गुबातीचा ब्लॉकबस्टर चित्रपट हिंदी रीमेकमध्ये काम करणार असल्याचे समोर आले आहे. चर्चा आहे की, तो लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरु करेल. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे.

तेलुगु सुपरस्टार वेंकटेश दग्गुबातीचा हा चित्रपट आहे-संक्रांतिकी वस्तुनम'. तो ब्लॉकबस्टर ठरला होता. आता चित्रपटाचे हिंदी रिमेक बनण्यास तयार आहे. या चित्रपटाने साऊथ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार या नव्या अंदाजात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

image of Akshay Kumar
Priya Berde comeback Kajalmaya | प्रिया बेर्डेचा 'काजळमाया'मधून जबरदस्त कमबॅक, अशी भूमिका तुम्ही कधीच पाहिली नसेल!

सूत्रांनुसार, अक्षय लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी निर्मात्यांकडून तयारी सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एक प्रसिद्ध साउथ दिग्दर्शक करणार असून, हिंदी प्रेक्षकांसाठी कथा थोडी अपडेट केली जाणार आहे.

ॲक्शन-कॉमेडीचा हिंदी रीमेक काय जादू दाखवणार?

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल रविपुडीने केले होते. तेलुगूमध्ये दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने जगभारात ३०० कोटी रुपयांची कमाई केली होती त्याची कथा एकाच वेळी अ‍ॅक्शन, फॅमिली ड्रामा आणि विनोदी प्रसंगांनी भरलेली होती. अक्षय कुमार अशा मल्टी-जॉनर भूमिकांसाठी ओळखला जातो, आता तो हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

चित्रपटात अक्षयसोबत कोण अभिनेत्री झळकणार याबाबत अजून खुलासा झालेला नाही. सध्या कास्टिंगवर काम सुरु आहे. चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरु होणार होते, पण अक्षयच्या बिझी शेड्यूलमुळे शूटिंग पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे.

image of Akshay Kumar
Sajid Khan will comeback | MeToo च्या आरोपानंतर ७ वर्षांनी साजिद खानची वापसी; 'या' स्टारकिडला करणार लॉन्च?

मूळच्या चित्रपटाची कहाणी काय?

'संक्रांतिकी वस्तुनम' मध्ये एक भारतीय सीईओ आकल्ला (अवसरला श्रीनिवास) चे अपहरण होते. जो हैदराबादमध्ये जगभरातील एक नंबरच्या टेक कंपनीचा दौरा करण्यासाठी आलेला असतो. त्यानंतर कहाणीमध्ये एंट्री होते वायडी राजू (वेंकटेश) ची, तो एक निलंबित पोलिस अधिकारी असतो. चित्रपटात ऐश्वर्या राजेश आणि मीनाक्षी चौधरी या अभिनेत्री आहेत. हे तिघे मिळून अपहरणाच्या रहस्यमयी घटनेचा उलगडा सोडवण्याचा प्रयत्न करतात.

अक्षय कुमारचे आगामी प्रोजेक्ट

अक्षय 'भूत बंगला', 'वेलकम टू द जंगल', ‘हैवान’ चित्रपटात दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news