पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'खेल-खेल में'ची नव्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. आधी हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे नव्हे तर मागे ठेवण्यात आलीय. पण, 'खेल-खेल में' ची रिलीज डेट आणि त्याच दिवशी इतर दोन तगड्या कलाकारांच्या चित्रपटांचीही रिलीज डेट आहे. 'खेल-खेल में' आता स्वातंत्र्य दिनी रिलीज होणार आहे. या दिवशी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट पुष्पा २ द रूल देखील रिलीज होणार आहे.
अधिक वाचा –
इतकचं नाही तर आधी जॉन अब्राहमने अल्लू अर्जुनच्या चित्रपटाशी पंगा घेतला आहे आणि आपल्या वेदा चित्रपटाची रिलीज डेट १५ ऑगस्ट ठेवली. वेदा आधी १२ जुलै रोजी रिलीज होणार होता. १२ जुलै रोजी अक्षय कुमारचा चित्रपट सरफिरा रिलीज होत आहे. तर अजय देवगनचा ॲक्शन पॅक्ड चित्रपट सिंघम अगेनचे देखील शेड्यूल १५ ऑगस्ट आहे.
अधिक वाचा –
बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार, अजय देवगन, जॉन अब्राहम मिळून साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा २ द रूलला टक्कर देतील. खेल-खेल में हा चित्रपट मुदस्सर अजीज यांनी दिग्दर्शित केला आहे.
अधिक वाचा –
चित्रपट निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, शशि सिन्हा आणि अजय राय आहेत. पहिल्यांदा निर्मात्यांनी कन्फर्म केलं होतं की, चित्रपट ६ सप्टेंबर, २०२४ रोजी रिलीज होणार आहे. कारण, ९ सप्टेंबर रोजी अक्षय कुमारचा वाढदिवस आहे.