Akshay kumar daughter: अक्षय कुमारच्या मुलीला आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या विकृतास अटक

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार यांची मुलगी नितारा कुमार हिच्यासोबत ऑनलाइन गेम खेळताना एका व्यक्तीने गैरवर्तन केले होते.
mumbai bollywood akshay kumar
Akshay kumar daughter: अक्षय कुमारच्या मुलीला आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या विकृतास अटक file photo
Published on
Updated on

akshay kumar daughter harassment case person nude pictures arrested shocking incident

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार यांची मुलगी नितारा कुमार हिच्यासोबत ऑनलाइन गेम खेळताना एका व्यक्तीने गैरवर्तन केले होते. त्यानंतर अभिनेत्याने सायबर पोलिसांकडे मदत मागितली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी अपडेट काय आहे, ते जाणून घेऊया.

mumbai bollywood akshay kumar
Patralekha Body Shaming |बॉडी शेमिंगवरून टीका करणाऱ्या पापराझींना पत्रलेखाने सुनावले, म्हणाली...''मी दिवसभर बसून फक्त..''

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारची मुलगी नितारा कुमार हिच्यासोबत 2025 मध्ये एका धक्कादायक घटना घडली होती. त्या वेळी ऑनलाइन गेम खेळताना एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिच्याकडे अश्लील फोटो मागितले होते. ही बाब Akshay Kumar यांच्या लक्षात येताच त्याने तत्काळ कारवाई करत सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली असून अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांनीही याची पुष्टी केली आहे.

याशिवाय त्यांनी मुंबईतील आर. डी. नॅशनल कॉलेजमध्ये जनजागृतीसाठी एक कार्यक्रम आयोजित केला आणि समुपदेशन केले. या कार्यक्रमात सोशल मीडिया सुरक्षा, आर्थिक फसवणूक, फिशिंग हल्ले आणि सायबर बुलिंग यांचा सामना कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याच वेळी त्यांनी 2025 मधील नितारा कुमारसोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेचाही उल्लेख केला.

mumbai bollywood akshay kumar
Film Bhooth Bangla | 'अब मजा आएगा ना भिडू' 'भूत बंगला'चे मोशन पोस्टर पाहून नेटकऱ्यांना आठवला 'भूल भुलैय्या', म्हणाले...

यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये Akshay Kumar ने सोशल मीडियावरून हा प्रसंग शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते की – “मी तुमच्यासोबत एक छोटासा प्रसंग शेअर करू इच्छितो, जो काही महिन्यांपूर्वी माझ्या घरी घडला होता. माझी मुलगी एक व्हिडिओ गेम खेळत होती. काही गेम असे असतात की जे तुम्ही ऑनलाइन इतरांसोबत खेळू शकता, पण समोरचा व्यक्ती अनोळखी असतो. खेळताना तुम्ही ‘थँक यू’, ‘दैट वॉज ग्रेट’, ‘यू आर डूइंग सो गुड’ असे संदेशही पाठवू शकता.

अक्षय कुमारने पुढे असे सांगितले की,

“जेव्हा माझी मुलगी ऑनलाइन गेम खेळत होती, तेव्हा समोरून मेसेज आला की ‘तू कुठून आहेस?’ माझ्या मुलीने ‘मुंबई’ असे लिहिले. त्यानंतर तो व्यक्ती सामान्यपणे बोलू लागला. त्याने ‘वेल प्लेड’ असे लिहिले, जो आदरयुक्त मेसेज होता. पण त्यानंतर अचानक मेसेज येतो—‘तू महिला आहेस की पुरुष?’ माझ्या मुलीने सांगितले की ती मुलगी आहे. मग पुढे संवाद सुरू राहिला. त्यानंतर त्या व्यक्तीने लिहिले—‘तू मला तुझे न्यूड फोटो पाठवू शकशील का?’

माझी मुलगी लगेच गेम बंद करते आणि ही गोष्ट जाऊन तिच्या आईला सांगते. सुदैवाने तिने लगेच माझ्या पत्नीला हे सांगितले, आणि इथूनच हे सगळं सुरू झालं. हे सायबर क्राइमचाच एक भाग आहे.” आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या Akshay Kumar यांचा Bhoot Bangla हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि अवघ्या आठवड्यातच त्याने आपला बजेट वसूल केला आहे. या चित्रपटाने सुमारे 150 कोटी रुपयांची कमाई केली असून पुढील काळातही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news