शाहरुखच्या रा. वन सिनेमातील लोकप्रिय गाण्याचे गायक अॅकॉनबाबत महत्त्वाची बातमी समोर येते आहे. अॅकॉनने त्याचे 29 वर्षाचे लग्न संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. अॅकॉनने आणि पत्नी टोमेका थियम यांनी लग्नाच्या 29 व्या वाढदिवसासाठी काहीच दिवस अवकाश असताना हा निर्णय घेतला आहे. (Latest Entertainment News)
अॅकॉनची पत्नी टोमेकाने घटस्फोटासाठी अर्ज दिले आहेत. 1996 मध्ये या जोडीने लग्न केले होते. या दोघांना एक 17 वर्षांची मुलगी आहे. 15 सप्टेंबरला या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.
टोमेकाला मुलीच्या कस्टडी दोघांनी घेण्याची इच्छा आहे. अॅकॉन आपल्या मुलीला भेटू शकतात. पण अॅकॉनला या घटस्फोटाचा आर्थिक फायदा मिळू नये याबाबत ठाम आहे.
टोमेका एक उद्योजिका आहे.
अलियाउन थियाम असे अॅकॉनचे मूळ नाव आहे. त्याने कायमच बहूविवाह प्रथेचे समर्थन केले आहे. याचे श्रेय तो आपल्या मूळ संस्कृतीला देतो. एका मुलाखतीमध्ये त्याने खुलासा केला आहे की त्याला नऊ मुले आहेत. डेटिंग आणि लग्न या प्रकारात फारसा फरक नसल्याचे त्याचे मत आहे.
अॅकॉनचे करियर अनेक सुपरहिट गाण्याने गाजले आहे. 2000 च्या दशकात लॉक्ड अप आणि स्मॅक दॅट ही त्याची गाणी अनेक काळ लिस्टमध्ये टॉपवर होती. अॅकॉन यांनी अनेकदा इतर कलाकारांसाठी हूक्स गायले आहेत.
अॅकॉनने शाहरुख खानच्या रा. वन सिनेमात क्रिमिनल आणि छम्मक छल्लो ही दोन लोकप्रिय गाणी गायली होती.