

मोहित सूरी दिग्दर्शित सैय्यारा सिनेमा आतापर्यंत यावर्षीच्या सगळ्यात मोठ्या रिलीजपैकी एक आहे. संगीत, कथानक या सगळ्याच पातळीवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण या सिनेमाने बॉलीवुडला एक फ्रेश जोडीही दिली आहे. कृश कपूर, वानी बात्राच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भुरळ पाडली. पण अहान पांडे आणि अनीत पड्डाची ही जोडी आता सिनेमाच्या क्लायमॅक्स पुरतीच नाही तर रियल लाईफमध्येही एकत्र दिसते आहे. (Latest Entertainment News)
याला निमित्त आहे ते अनीतच्या वाढदिवसाचे. तिच्या वाढदिवसानिमित्त अहान पांडेने सोशल मिडियावर काही खास अनसीन फोटो शेयर केले होते. एका कॉन्सर्टदरम्यानच्या या फोटोत दोघेही धमाल करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत तो क्षण एंजॉय करणारी अनीत दिसते आहे. तिसऱ्या फोटोत हे दोघेही कॉन्सर्ट रिस्टबॅंड दाखवत आहेत. तर पुढच्या फोटोत अनीत हसताना दिसते आहे.
एका रिपोर्टनुसार हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. सैय्याराच्या सेटवर दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अर्थात दोघांनी या नात्याबाबत एकही शब्द शेयर केलेला नाही. सिनेसृष्टीच्या एकूणच झगमगाट हे दोघेही आपले नाते प्रायवेट ठेवण्याला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.
अनीतने अभिनेत्री कियारा आडवाणीला रीप्लेस करत शक्तिशालिनीसाठी दावेदारी सिद्ध केली आहे. याशिवाय एक कोर्टरूम ड्रामा नव्यामध्येही ती दिसणार आहे.
तर अहान पांडे अली अब्बास जफरचे दिग्दर्शन असलेल्या एका सिनेमात तो शर्वरी वाघ हिच्यासोबत झळकणार आहे.