

Ahaan Panday New look for upcoming project
मुंबई — सैयारा चित्रपटानंतर अभिनेता अहान पांडेची 'गाडी चल पडी है'. तो पुन्हा एका नव्या लूकमधून प्रेक्षकांसमोर येतोय. रिपोर्टनुसार, अली अब्बास जफर यांच्या रोमँटिक चित्रपटात तो खास भूमिका साकारणाऱ आहे. अहान पांडेने नवे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून 'दॅ्टस इट्स कट' अशी कॅप्शन लिहिलीय. त्याच्या नव्या लूकचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे की, तो नक्कीच नव्या चित्रपटासाठी काम करत आहे.
नुकतेच अहानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तो पूर्णपणे बदललेला दिसतो. नेहमीच्या लूकपेक्षा तो अधिक लक्षवेधी दिसतोय. या लूकने चाहत्यांची उत्सुकता आणि चर्चा वाढवली आहे. काहीजण म्हणताहेत की, “हा अवतार त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरेल.”
या लूकसोबतच, तो रिपोर्टनुसार अहान अली अब्बास जफर यांच्या आगामी चित्रपटासाठी खास तयारी करत आहे. केवळ हँडसम नाही तर ॲक्शन शैलीतून त्याला प्रेक्षकांसमोर यावे लागणार आहे. रिपोर्टनुसार, तो स्वत: जिममध्ये घाम गाळतोय. अहान तीन महिन्यांसाठी हा प्रवास सुरू करणार आहे, ज्यातून त्याला अॅक्शन सीनसाठी फिटनेस करता येईल.
या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री शर्वरी वाघ हिचे नावही समोर आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहे. निर्मिती आदित्य चोप्रा करतील.
अहानने फोटो शेअर करत लिहिले- And that’s a cut. फोटोमध्ये तो ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक जॅकेट घालून उभा आहे. त्याची भेदक नजर लक्ष वेधणारी आहे. अहानच्या या नवीन लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्याच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतोय. बॉलीवूडमध्ये रेकॉर्ड ब्रेक करेल, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
सैयाराच्या माध्यमातून यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरीने अहानला सुपरस्टार बनवले. आता आणखी एक नवा ॲक्शन-रोमान्स चित्रपट अहान नव्या अंदाजात सादर करेल. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे टायटल अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाचे शूटिंग २०१६ रोजी सुरु होईल. आदित्य चोप्रा आणि अली अब्बास जफर यांचा हा पाचवा चित्रपट असेल. त्यांनी सुल्तान, टायगर ज़िंदा है, मेरे ब्रदर की दुल्हन, गुंडे यासारखे चित्रपट दिले आहेत.