करण जोहरला दिलं खरमरीत उत्तर आणि समंथा होऊ लागली सोशल मीडियावर ट्रेंड

करण जोहरला दिलं खरमरीत उत्तर आणि समंथा होऊ लागली सोशल मीडियावर ट्रेंड
Published on
Updated on

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अनेक गोष्टींमुळे लाईमलाईटमध्ये असते. कधी नागा चैतन्य सोबत फारकत घेतल्या नंतर तर कधी तिच्या उत्तम अदाकारीसाठी चाहत्यांकडून होणा-या कौतुकामुळे प्रकाशझोतात येताना दिसते. पण आता सध्या एका वेगळ्याच कारणाने ती ट्रेंड होताना दिसते आहे. नुकताच कॉफी विथ कारणच्या सातव्या सीझनचा प्रोमो समोर आला आहे. वाद किंवा खळबळजनक गौप्यस्फोटाची किनार या शोला कायमच लागलेली असते.

या शोच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी धक्कादायक खुलासे केले तर अनेकजण अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल झाले.
तरीही या सीझनची लोकप्रियता अजिबात कमी होताना दिसत नाहीये. धडाकेबाज सहा सीझननंतर या सीझनमध्ये अनेक चमचमते सितारे हजेरी लावताना दिसत आहेत.

पण या प्रोमोमध्ये अक्षयसोबत आलेल्या समंथाने मात्र लक्ष वेधून घेतलं आहे. मितभाषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या समंथाने या सीझनला करणवरच गुगली टाकली आहे. अर्थातच तिच्या या गुगलीमुळे ती ट्वीटरवर ट्रेंडही करू लागली. या शोमध्ये ती करणला म्हणते की तू तुझ्या सिनेमात आयुष्य 'कभी खुशी कभी गम'मधल्या सारखं सुखी आणि शानदार दाखवतोस पण प्रत्यक्षात ते केजीएफ सिनेमासारखी संघर्षमय असते.

तिच्या या उद्गारांनी करण चांगलाच अवाक होताना दिसतो आहे. या सीझनच्या प्रोमोमध्येही चटपटीत मसाला ठासून भरलेला दिसतो आहे. समंथा यात अक्षयकुमारसोबत येते आहे. तर कबीर सिंगची प्रसिद्ध जोडी शाहिद आणि कियाराही यात हजेरी लावणार आहेत. तर अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडाही या सीझनमध्ये धमाल करताना दिसतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news