

मुंबई : आपल्या हटके फॅशनमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कारण तिची फॅशन नसून, तिच्या भावनिक पोस्टमधून सांगितलेला संघर्ष आहे.
(Urfi Javed Emotional Post)
उर्फीने एक पोस्ट शेअर करत सांगितलं की ती काही दिवस सोशल मीडियावर सक्रिय नव्हती कारण ती एका कठीण टप्प्यातून जात होती. “माझा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर होता. मी खूप प्रयत्न केले, पण दरवेळी नकारच मिळाले,” असं तिनं लिहिलं.
तिला Inde Wild या ब्रँडकडून Cannes Film Festival ला जाण्याची संधी मिळाली होती. “Diipa Khosla आणि Kshitij Kankaria यांचे आभार, पण दुर्दैवाने माझा व्हिसा रिजेक्ट झाला,” असं उर्फीने सांगितलं.
ती पुढे म्हणाली की, “मी आणि माझी टीम वेगळ्या प्रकारचे कपडे तयार करत होतो. पण व्हिसा रिजेक्ट झाल्यानं आम्ही खूप निराश झालो.”उर्फीने हेही स्पष्ट केलं की नकार मिळणं खूप कठीण असतं, पण त्यातून शिकणं गरजेचं आहे. ती म्हणाली, “मीही रिजेक्शनला सामोरी गेले आहे. सुरुवातीला त्रास होतो, पण नंतर तेच आपल्याला मजबूत बनवतं.”
तिनं तिच्या फॉलोअर्सना सांगितलं की, “तुमच्या रिजेक्शनच्या कथा #REJECTED हॅशटॅगसह पोस्ट करा आणि मला टॅग करा. मी त्या शेअर करेन जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल.” पोस्टच्या शेवटी उर्फी म्हणते, “हो, मी रडते. पण त्यानंतर काय? प्रत्येक नकारातही एक संधी असते. मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका.” उर्फीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे आणि अनेक लोक तिच्या या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत.