Prajakta Mali : प्राजक्ता माळीने चांगली साडी खिळे मारून खराब केलीय; नेटकरी म्हणाले…

Prajakta Mali
Prajakta Mali
Published on
Updated on

[visual_portfolio id="266550"]

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जुळून येती रेशीम गाठी' या मालिकेमुळे प्रकाश झोतात आलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali )सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या ती पॅरिसमध्ये सुट्यांचा आनंद घेत असून, तेथीलच फोटो तिने शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्याच्या नजरेस येताच चाहत्यांनी 'चक्क प्राजक्ता न्यूज पेपरमध्ये' असे म्हणत आणखी काही हटके कॉमेन्टस केल्या आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali ) नुकतेच पॅरिसमधील एका सायंकाळीचा काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ता एका भितींला लागून कठड्याजवळ उभी असल्याचे दिसतेय. यावेळी तिने परिधान केलेल्या साडीवर इंग्रजी भाषेतील न्यूज ठळक अक्षरांत दिसत आहेत. याशिवाय तिने यावर लाल रंगाचे सिव्हलेस ब्लाऊज परिधान करून चारचॉद लावले आहे. साडी-ब्लाऊजसह केसांची हेअर स्टाईल, मेकअपने तिच्या सौंदर्य अधिक खुलले आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'पॅरिसमधली एक संध्याकाळ' असे म्हणत ब्लॅक रंगाचा एक ईमोजी शेअर केला आहे. यासोबत तिने ही साडी उन्हाळ्याच्या दिवसासाठी खास असून पावसाळा उजाडला आहे असे म्हटले आहे. यावेळी प्राजक्ताने तिच्या गुडघ्यावर हात ठेवून हटके पोझ फोटोला दिली आहे. यातील खास म्हणजे, प्राजक्ताच्या साडीवर इंग्रजी अक्षरातील न्यूज स्पष्टपणे दिसतात.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. यात एका युजर्सने 'आजच्या ठळक बातम्या', 'फोटोशूट करून झालं असेल तर पेपर परत कर', 'चांगली साडी खिळे मारून खराब केलीस', 'दररोज आता न्यूज वाचल्या जाणार', 'तू नेहमी सुंदर दिसतेस', 'सर्वात जास्त साडीत फोटोशूट करणारी महिला असे वर्ल्ड रेकॉर्ड झालं पाहिजे', 'Wow', 'अप्रतिम ❤️❤️', 'superb', 'पेपरवाली ?', आणि 'कोण होतीस तू काय झालीस तू, अशी कशी..गेलीस तू' असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी रानबाजारमधील पोझ असल्याचे देखील म्हटलं आहे.

एका नेटकऱ्यांने नक्की साडीच आहे की, पेपर गुंडाळलाय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला सोशल मीडियावर २७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news