Hit and Run Case Actress Arrest | हिट अँड रन प्रकरणी अभिनेत्रीला अटक, विद्यार्थ्याचा झाला होता मृत्यू

Hit and Run Case Actress Arrest | हिट अँड रन प्रकरणात अभिनेत्री नंदिनी कश्यप अटकेत, विद्यार्थ्याला जोरदार धडक दिल्याने मृत्यू
image of Actress Nandini Kashyap
Hit and Run Case Actress Nandini Kashyap ArrestedInstagram
Published on
Updated on

Actress Nandini Kashyap arrested hit and run case

नवी दिल्ली - आसामची अभिनेत्री नंदिनी कश्यपला हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलीय. रिपोर्टनुसार, नलबारी पॉलिटेक्निकच्या एका २१ वर्षीय तरुणाला ज्याचे नाव समीउल हक आहे, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उदरनिर्वाहासाठी तो पार्ट टाईम नोकरी करायचा. पण नंदिने केलेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर मंगळवारी सायंकाळी नंदिनी कश्यपला उत्तर गुवाहाटीची राजधानी थिएटर मधून ताब्यात घेण्यात आलं. नंतर अटकेसाठी तिला दिसपूर पोलिस ठाण्यात आणण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी सांगितलं की, गुवाहाटीच्या ओदलबक्रा एरियात २५ जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली होती. समीउल हक हा गुवाहाटी नगर निगम टीममध्ये नाइट शिफ्टमध्ये काम करत होता. तो स्ट्रीटलाईट ठीक करण्याच्या कामात लागला होता. एका भरधाव कारने त्याला धडक दिली. कथितपणे गाडी नंदिनी कश्यप चालवत होती. ही दुर्घटना CCTV त कॅमेराबद्ध झाली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. त्याने मंगळवारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

image of Actress Nandini Kashyap
Saiyaara Collection | भारतात तुफान कमाई तर परदेशात मोठा विक्रम; 'सैयारा'ची अशीही जादू

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?  

एका वृत्तसंस्थेनुसार, फुटेजमध्ये दिसलं की, कार भरधाव होती आणि धडक मरल्यानंतर नंदिनी थांबली नाही, ती निघून गेली. प्रत्यक्षदर्शींनी या गोष्टीची पुष्टी केली की, अपघातानंतर ती थांबली नाही आणि तरुणाची मदत करण्याऐवजी ती पळून गेली. तेथील लोकांनी सांगितले की, दुर्घटनचा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो. तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडला होता. आम्ही रुग्णवाहिकेला फोन केला.

image of Actress Nandini Kashyap
Son Of Sardaar 2 | चीन राष्ट्राध्यक्षाचं नाव हटवलं; 'या' डायलॉग्जवर सेन्सॉरची कात्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news