Scoop : “स्कूप” मधील करिश्मा तन्नाच्या अभिनयाचं जगभरात कौतुक

 actress karishma tanna
actress karishma tanna
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर सध्या एका वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे "स्कूप". (Scoop ) या हिट वेब सीरीजने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. उत्कंठावर्धक अभिनय असलेल्या करिश्माची ही सीरिज चर्चेचा विषय ठरते आहे. करिश्मा तन्नाने पत्रकार म्हणून साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घरात करून गेली. प्रतिभावान दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही वेब सीरिज उत्तम प्रकारे दिग्दर्शित केली आहे. ही मालिका पत्रकारितेच्या गुंतागुंतीचा शोध घेते असताना यातील सगळी पात्र कथा खिळवून ठेवतात. करिश्माने साकारलेले पात्र जागृती पाठक हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. "स्कूप" पत्रकारितेच्या प्रवासावर अनोखा प्रकाश टाकतो. (Scoop )

एका प्रतिष्ठित पुरुष पत्रकाराच्या हत्येनंतर प्रसारमाध्यमांनी तिला गुन्हेगार ठरवले आणि इथून गोष्ट सुरू होते. "स्कूप" मध्ये असलेली महिला पत्रकार तिच्या वैयक्तिक आयुष्यातले चढउतार आणि पत्रकारितामधील आव्हानात्मक प्रवास अशा अनेक गोष्टी यातून बघायला मिळतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news