Jaya Bachchan : सून ऐश्वर्या राय सोडून जया बच्चन सर्वांसोबत आनंदी असतात

सून ऐश्वर्या राय सोडून जया बच्चन सर्वांसोबत आनंदी असतात
Jaya Bachchan- kajol Durga Puja
सून ऐश्वर्या राय सोडून जया बच्चन सर्वांसोबत आनंदी असतातJaya Bachchan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात सध्या दुर्गा पूजेची धामधूम बघायला मिळत आहे. नवरात्रौत्सवात दुर्गा पूजेसाठी बॉलिवुडमधील अनेक सेलिब्रिटी एकत्र येतात आणि देवीची पूजा करतात. यंदाही अभिनेत्री काजोल हिनेही यानिमित्त मुंबईतील सांताक्रूझमध्ये दुर्गा पूजेचे आयोजन केले होते. काजोल तिच्या कुटुंबीयांसोबत आणि कलाविश्वातील काही कलाकारांसोबत धूमधडाक्यात दुर्गा पूजा साजरी केली.

यंदाही अभिनेत्री राणी मुखर्जी, अयान मुखर्जी, रणबीर कपूर यांसारखे सेलिब्रिटी दुर्गा पूजेसाठी पोहोचले होते; पण या सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. जया आणि काजोल यांचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी जया यांना ट्रोलाही केले आहे. जया या अत्यंत आनंदाने काजोलची भेट घेतात. हसत-हसत तिला मिठी मारतात आणि तिच्या गालावर किस करतात, यानंतर दोघी बराच वेळ एकमेकींसोबत गप्पा मारताना व्हिडीओत दिसत आहेत. यानंतर विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत,

जया बच्चन या सून ऐश्वर्या रायला सोडून सर्वांसोबत आनंदी दिसत असतात अशी एकाने, तर दोघींचा स्वभाव एकसारखा असल्याने दोघींचे खूप पटते अशी दुसऱ्या एकाने, इतके प्रेम आपल्या सुनेवरही करायला हवे अशी तिसऱ्या एकाने कमेंट केली आहे. जया या सून ऐश्वर्यासोबत कधीच प्रेमाने वागत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.

(video : viralbhayani instagram वरून साभार)

Jaya Bachchan- kajol Durga Puja
Jaya Bachchan : …तू यापुढे जोरात पडशील: जया बच्चन फोटोग्राफरवर संतापल्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news