![आता होऊ दे धिंगाणा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2F%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-scaled.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'आता होऊ दे धिंगाणा' कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी हा कार्यक्रम महाराष्ट्रातला नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेच्या एपिसोड 'आई कुठे काय करते' आणि 'मुलगी झाली हो'च्या टीममध्ये रंगणार आहे. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे. आजवर प्रेक्षकांनी माऊचा आवाज ऐकलेला नाही. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यांदाच माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे.
माऊची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकरसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गेले दोन वर्ष दिव्या 'माऊ'ची व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. माऊ कधी बोलणार? हा प्रश्न प्रेक्षक सतत विचारायचे. 'आता होऊ दे धिंगाणा'मुळे हा सुवर्णयोग जुळून आला आहे. ढोल- ताश्यांच्या गजरात माऊची एन्टी होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव तर सळसळता उत्साह आहेत. या मंचामुळे माऊची बोलण्याची इच्छा पूर्ण होणार आहे अशी भावना दिव्याने व्यक्त केली.
हेही वाचलंत का?