

बांगलादेशातील हृदयद्रावक व्हिडिओ समोर आल्यापासून, प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे. दरम्यान, देवोलिना भट्टाचार्जीने यूट्यूबर ध्रुव राठीलाही फटकारले आहे.
बांग्लादेशमधून एक मन सून्न करणारी घटना समोर आली होती. फोटोज आणि व्हिडिओज पाहून लोकांचे मन सुन्न झाले होते. कार्यकर्ता शरीफ उस्मान हानिच्या मृत्यूनंतर एकाला रस्त्यावर जाळण्यात आलं होतं. त्या व्यक्तीने आक्षेपार्ह कॉमेंट केली होती. या घटनेशी संबंधित व्हिडिओज फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सामान्य जनता ते सेलेब्स पर्यंत या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत. बांगलादेशातील हृदयद्रावक व्हिडिओ समोर आल्यापासून, प्रत्येकजण संतापाने व्यक्त करत आहे. दरम्यान, देवोलीना भट्टाचार्य यांनीही युट्यूबर ध्रुव राठीला फटकारले आहे.
सर्वात आधी रविवारी कॉमेडियन मुनव्वर फारूकीने या घटनेची निंदा करत खूपच निर्दयी असल्याचे म्हटले. बिग बॉस १५ फेम राजीव अदतियाने देखील या घटनेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आता लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (गोपी बहु)ने देखील हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
देवोलिनाने काय म्हटलं?
अभिनेत्री देवोलिनाने सोशल मीडियावर ट्विट केले, "जर हे फुटेज आसाम आणि भारतात राहणाऱ्या प्रत्येक बांगलादेशीविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे नसेल तर... तर तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात. घृणास्पद लोक... आसामला लवकरात लवकर या किड्यांपासून आणि बदमाशांपासून मुक्त करा." दरम्यान, तिने ध्रुव राठीच्या ट्विटबद्दलही ट्विट केले.
खरंतर, ध्रुवने 'धुरंधर'बद्दल सतत नकारात्मक कॉमेंट केले होते. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले. यानंतर देवोलिनाने त्याला फटकारले. ध्रुव राठीला उत्तर देताना देवोलीना म्हणाली, "म्हणूनच मी तुमचे घाणेरडे व्हिडिओ आणि ट्विट पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. मला माहित नाही की, तुमचे व्हिडिओ एक्स वारंवार माझ्या फीडवर शो का करतो.''
अभिनेत्रीने पुढे लिहिले, "धुरंधरबद्दल विचार करणे थांबवा आणि तुम्ही बांगलादेशातील हिंदूंसाठी कधी बोलणार हे सांगा?" ध्रुव राठीने धुरंधर चित्रपटावर टीका केली आहे. देवोलीनाने हे देखील लक्षात घेऊन ट्विट केले आहे.