Missing Actress: रस्त्यावर सापडलेल्या वडिलांना ओळख दाखवण्यासही या अभिनेत्रीने दिला होता नकार; सलमानने केली होती मदत

जगदीश माळी यांची मुलगी अंतराने अभिनयाला करियर म्हणून निवडले
Entertainment
अभिनेत्री अंतरा माळी Pudhari
Published on
Updated on

बॉलीवुडच्या झगमगाटाला ज्या प्रकारे एक चकचकीत बाजू आहे त्याच प्रकारे एक काळी अंधारातील बाजूही आहे. या अंधाऱ्या बाजूने आजवर अनेक गोष्टी आपल्या पोतडीत ठेवल्या आहेत. ज्या समोर आल्यावर कळते इथल्या लोकांचे पायही मातीचेच आहेत. अशाच एका अभिनेत्रीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जी आली तेव्हा अनेकांनी कौतुकाची फुले उधळली पण त्यानंतर ती ती या अंधारात कुठे गायब झाले हे समजले देखील नाही. (Latest Entertainment News)

अंतरा माळी हे नाव आता विस्मृतीमध्ये गेलं असले तरी 2000च्या दशकात या नावाने प्रत्येकालाच आपली दखल घ्यायला भाग पाडले होते.

प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांची मुलगी अंतराने अभिनयाला करियर म्हणून निवडले. 1988 मध्ये 'ढुंढते रह जाओगे' या सिनेमाने तिने करियरची सुरुवात केली. मराठमोळ्या उर्मिला मांतोंडकरशी तुलना सतत वाट्याला आलेल्या अंतराने अल्पावधीतच राम गोपाल वर्माचे लक्ष वेधून घेतले.

Entertainment
Ankita Prabhu Walavalkar: अंकिता वालावलकरने शेयर केली गुड न्यूज; म्हणते, या मंगलदिनी मी आणि कुणाल..

रामु कॅम्पमध्ये अंतराचा प्रवेश

राम गोपाल वर्मा हे नाव 2000 दशकात अनेक यशस्वी सिनेमांशी जोडले जात होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रेमकथा, मस्त, रोड, कंपनी, डरना मना है आणि नाच या सिनेमात अंतरा दिसली.

पण तिला समीक्षकांचे जास्त कौतुक मिळाले ते 'मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू' या सिनेमाने. या सिनेमाला व्यावसायिक यश मात्र अजिबातच मिळाले नाही.

इतके सगळे सिनेमे करूनही अंतरापासून यश लांबच होते. 2010 मध्ये अंतराने सिनेसृष्टि सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या अचानक अभिनय सोडण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वडील रस्त्यावर सापडले अन्

2010 ते 2012 अंतरासाठी शांततेत गेल खरे पण 2013 मध्ये ती पुन्हा प्रकाशझोतात आली. अभिनेत्री मिंक ब्रारहिला अंतराचे वडील जगदीश माळी वर्सोवातील रस्त्यावर बेशुद्धवस्थेत सापडले होते. त्यावेळी अंतराला तिने कळवले तेव्हा अंतराने कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. असे सांगितले जाते की अंतरा त्यावेळी गर्भवती होती.

त्यानंतर मिंकने जगदीश माळी यांच्यासाठी सलमानकडून मदत मागितली. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी अंतराची इमेज व्हिलन अशी बनवली गेली.

Entertainment
Viral Video: फॅनसोबत सेल्फी घेताना हेमामालिनी यांनी केले असे की...... युजर म्हणाले सुरकुत्या आल्या तरी…

त्यावेळी अंतराने सांगितले की तिच्या वडिलांना लिव्हर आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे ते अनेकदा चक्कर येऊन पडतात. यानंतर काही दिवसांनी जगदीश माळी यांनीही अंतराबाबत मनात राग नसल्याचे स्पष्ट केले होते.

अंतरा मोठ्या स्क्रीनवर 2010 मध्ये शेवटचे दिसली होती. अमोल पालेकर यांच्या अँड वन्स अगेन या सिनेमातील भूमिकेसाठी तिने सगळे केसही कापले होते. पण यशाने यावेळीही तिच्याकडे पाठच फिरवली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news