

आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या 'द बॅडस ऑफ बॉलीवूड'बाबत रोज काहीतरी नवीन बातमी समोर येते आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या या सिनेमाने स्वत:चा प्रेक्षकवर्गही निर्माण केला. पण या शोमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती एकाच सीनची. (Latest Entertainment News)
त्या सीनमध्ये पूर्व नारकोटिक्स अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी साधर्म्य दाखवणारी व्यक्ती दिसली. अर्थात ही बाब खुद्द समीर वानखेडे यांना रुचली नाही. त्यांनी बॅडस ऑफ बॉलीवुडविरोधात मानहानीचा दावाही दाखल केला.
ज्यामध्ये समीर यांच्यासारखी व्यक्तिरेखा दाखवल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचा दावा समीर यांनी केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की यात त्यांना आक्षेपार्ह काहीच आढळले नाही.
अभिनेता आशिष कुमारने या शोमध्ये एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत आशिष दिसला आहे. यात त्याला 'साध्या कपड्यातला पोलिस अधिकारी' असे संबोधले आहे. त्याच्या या भूमिकेबाबत त्याला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप पडत आहे.
अर्थात एका कमेंटमध्ये त्याची फिरकीही घेतली आहे. एक कमेंटमध्ये 'भाई तो शोधतो आहे.’ आशिषने कमेंट केली की 'कोण?’ तर तो यूजर म्हणतो, ‘ समीर, ज्याचा रोल तू केलास.’ यावर आशिषने केवळ हसण्याची इमोजी पोस्ट केली.
तर दुसरा म्हणतो, ‘समीर वानखेडेची फिल्डिंग सेट केली तुम्ही.’ यावर आशिष म्हणतो, 'भाई मी तर माझे काम केले'.
या शोमध्ये असे दाखवले जाते आहे की, यामध्ये अधिकारी असलेला आशिष एका बॉलीवुड निर्मात्याने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये पोहोचतो. त्याठिकाणी अशा अभिनेत्या अटक करतो ज्याच्याजवळ कोणतेही ड्रग नसते. समीर वानखेडे यांनी आपल्या दाव्यात म्हणले आहे की ही व्यक्तिरेखा त्यांच्यावर बेतली आहे.