

Singer Parmish Verma injured during shera shooting
मुंबई - प्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता परमिश वर्मा शूटिंग वेळी जखमी झाल्याचे वृत्त समोर आळे आहे. अंबालामध्ये शेरा चित्रपटाच्या शूटिंगवेळी बंदुकीची गोळी गाडीच्या काचांना लागली. आणि त्या काचा फुटून गायकाच्या चेहऱ्यावर लागलल्या. परमिश शूटिंग थांबवून चंदिगढमद्ये परतला असल्याची माहिती मिळतेय.
सूत्रांच्या माहितीनुसार, परमिश शूटिंग दरम्यान आपल्या कार मध्ये बसला होता. तेव्हा नकली गोळी कारच्या खिडकीला धडकली, ज्यामुळे गाडीच्या काचा फुचल्या आणि परमिशच्या चेहऱ्यावर लागल्या. आतापर्यंत चित्रपटाच्या युनिटकडून कुठलीही अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही.
परमिश वर्माने मात्र त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या घटनेबद्दल लिहिले आहे. "ही घटना चित्रपट 'शेरा' च्या सेटवर झाला. ईश्वराच्या कृपेने मी आता एकदम ठिक आहे." असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
हा चित्रपट १५ मे, २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. परमिश वर्मा मुख्य भूमिकेत (शेरा) दिसेल. दिग्दर्शन सावियो संधू करत आहेत.
याआधीही परमिश वर्मा गँगस्टर हल्ल्यातून वाचला होता. १३ एप्रिल २०१८ मध्ये मोहालीत त्याच्यावर गोळीबार झाला होता. त्याच्या पायाला गोळी लाहली होती. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर दिलप्रीत बाबाने घेतली होती.