Ashtapadi Movie | आजपर्यंत कधी न पाहिलेली कहाणी घेऊन येतोय 'अष्टपदी'

Ashtapadi Movie Santosh Juvekar | संतोष जुवेकर, मयुरी कापडणेसह अन्य कलाकारांचा 'अष्टपदी' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
image of Ashtapadi Movie
संतोष जुवेकर आणि मयुरी कापडणे यांच्याससोबत अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत. Instagram
Published on
Updated on

Actor Santosh Juvekar Ashtapadi Movie

मुंबई : 'अष्टपदी' या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. 'अष्टपदी' चित्रपटाचे नवीन लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'अष्टपदी' ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली 'अष्टपदी' चित्रपटाची निर्मिती केली आहे. उत्कर्ष जैन यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. 'अष्टपदी'ची कथा, पटकथा व संवादलेखन महेंद्र पाटील यांचे असून महेंद्र पाटील हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत.

रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरला लग्नाच्या मंडपाची पार्श्वभूमी आहे. त्यावर मुख्य भूमिकेतील कलाकारांसह सहाय्यक भूमिकेतील कलाकारही आहेत. आपणा सर्वांना लग्नातील सप्तपदी माहित आहे, पण अष्टपदी म्हणजे नेमके काय? याबाबतचे कुतूहल वाढले आहे. या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना सिनेमागृहात मिळणार असल्याचे सांगत उत्कर्ष जैन म्हणाले की, 'अष्टपदी'मध्ये प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहायला मिळालेले कथानक पाहायला मिळणार आहे.

image of Ashtapadi Movie
Operation Sindoor | त्यांनी म्हटलं होतं ना..'मोदी को बता देना', आता घ्या..'मोदींनी दाखवून दिलं..'

भारतीय संस्कृतीतील लग्न हा महत्त्वाचा घटक मानला जातो. या निमित्ताने केवळ दोन जीवांचे नाते जोडले जात नसून, दोन कुटुंब एकत्र येत असतात. या चित्रपटात भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करण्यात आले आहे की आणखी काय आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेल. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. संतोष जुवेकरचे आजवर कधीही समोर न आलेले रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या जोडीला मयुरी कापडणे असल्याने दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांचे लक्ष वेधणार आहे. 'अष्टपदी'मधील नयनरम्य लोकेशन्स आणि तिथे शूट करण्यात आलेली दृश्ये प्रेक्षकांचे मन मोहतील अशी आशाही जैन यांनी व्यक्त केली.

image of Ashtapadi Movie
Operation Sindoor Fawad Khan-Hania Amir | 'चोराच्या उलट्या...' 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बरळले फवाद, माहिरा खान, हानिया आमिर

संतोष जुवेकर आणि मयुरी कापडणे यांच्यासोबत या चित्रपटात अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर, विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे, जगदीश हाडप, महेश जोशी आदी कलाकार आहेत. गीतकार गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेली गाणी संगीतकार मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केली असून, पार्श्वसंगीतही त्यांनीच दिलं आहे. धनराज वाघ या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर असून, निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. अतुल शिधये यांनी रंगभूषा, तर अंजली खोब्रेकर, स्वप्ना राऊत यांनी वेशभूषा केली आहे. नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केले आहे. राहुल पाटील आणि नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून, कार्यकारी निर्माते अजय खाडे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news