Actor Salman Khan : ३० वर्षापूर्वी सलमानच्या ‘या’ चित्रपटाने जमवला होता १०० कोटीचा गल्ला, १ वर्ष चित्रपट चित्रपटगृहात चालला

Actor Salman Khan : ३० वर्षापूर्वी सलमानच्या ‘या’ चित्रपटाने जमवला होता १०० कोटीचा गल्ला, १ वर्ष चित्रपट चित्रपटगृहात चालला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आपल्या चित्रपटामुळे कायम चर्चेत असतो. सलमान खानने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 'बिवी हो तो ऐसी' या पहिल्या चित्रपटापासून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मैने प्यार किया, बागी, लव पथर के फुल असे अनेक रोमँटिक चित्रपट त्याने केले. २००९ मध्ये आलेल्या वाँन्टेंड या चित्रपटापासून त्याने अॅक्शन चित्रपट करायला सुरूवात केली. सध्या सलमान प्रेषकांच्या पसंतीचा चेहरा झाला आहे. त्यामुळे त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालतात. परंतु सलमानचा ३० वर्षापुर्वीचा असा एक चित्रपट आहे, ज्याने त्यावेळी १०० कोटीचा गल्ला जमविला होता. तसेच हा चित्रपट जवळ- जवळ १ वर्ष चित्रपटगृहात चालला. चला पाहूया हा कोणता चित्रपट आहे. (Actor Salman Khan)

हा आहे 'तो' चित्रपट

एका कौटुंबिक कथेतून प्रेषकांच्या पसंतीस उतरलेला सलमान खानचा 'हम आपके है कौन' हा चित्रपट १९९४ साली हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. सूरज बडजात्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रचंड गाजला, चाहत्यांच्या मनावर देखील या चित्रपटाने छाप पाडली. यातून 'हम आपके हैं कौन' या चित्रपटाने तब्बल १०० कोटीचा गल्ला जमविला. जवळ-जवळ एक वर्षभर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. चित्रपटगृहात तुफान चालणारा त्या काळचा हा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाला ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून, सलमान खान आणि माधुरी दीक्षित या जोडीला प्रषेकांनी त्यावेळी अक्षरश : डोक्यावर घेतले होते. (Actor Salman Khan)

'हम आपके हैं कौन' चित्रपटाचे कलेक्शन

दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी दिग्दर्शन केलेल्या 'हम आपके है कौन' चित्रपटाच्या निर्मितीसाठी केवळ ६ कोटी रुपये खर्च केले होते. परंतु, कौटुंबिक कथानक असल्याने हा चित्रपट प्रषेकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या चित्रपटाने देशात ७२ कोटी रुपये आणि जगभरात १०० कोटींहून अधिक कोटींची कमाई केली. (Actor Salman Khan)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news