Abhishek Bachchan | ...तिच्यासोबत रेड कार्पेटवर चालणे भीतिदायक! अभिषेक बच्चनने सांगितला रेड कार्पेटवरचा अनुभव

Abhishek Bachchan | ...तिच्यासोबत रेड कार्पेटवर चालणे भीतिदायक! अभिषेक बच्चनने सांगितला रेड कार्पेटवरचा अनुभव
Published on
Updated on

अभिषेक बच्चनने नुकताच आपला रेड कार्पेटवरचा अनुभव सांगितला आहे. त्याने म्हटलं की, पत्नी ऐश्वर्या जेव्हा रेड कार्पेटवर चालते तेव्हा तिच्यासमवेत चालण्याचा अनुभव हा अतिशय भीतिदायक असतो. अभिषेकने लिली सिंगला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, माझ्या पत्नीला तुम्ही कधी रेड कार्पेटवर पाहिलं आहे का? तिचा अंदाज कायमच वेगळा असतो. माझ्यासाठी रेड कार्पेटवर जाणंच खूप त्रासदायक असतं.

एवढंच नव्हे तर ऐश्वर्यासोबत रेड कार्पेटवर जावं लागलं तर ही भीती आणखीनच वाढते. पुढे अभिषेक म्हणाला की, ऐश्वर्याचा अनुभव आणि तिचं सौंदर्य यापुढे तो स्वतःला एक लाकडाची काठी समजतो. अभिषेकने सांगितलं की, आता रेड कार्पेटवर लोकं अतिशय प्रोफेशनल आणि खूप अनुभवी दिसतात. मात्र त्याला खूप वेगळं वाटतं. पुढे तो सांगतो की, त्याला या सगळ्यात फार विचित्र वाटत असतं. हात पॉकेटमध्ये टाकू की नको, असं सतत वाटत असतं! एवढंच नव्हे तर अभिषेकने हेदेखील मान्य केलं की, त्याला ऐश्वर्याच्या प्रगतीने असुरक्षितदेखील वाटतं.

अभिषेक आणि ऐश्वर्या 'सरबजीत' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी रेड कार्पेटवर होते. त्या क्षणाचे व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात फोटो काढत असताना अभिषेक अचानक निघून जाताना दिसत होता, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न निर्माण झाले. तेव्हापासून, ते विभक्त झाले आहेत किंवा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत अशा अफवा ऑनलाइन पसरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news