पुढारी ऑनलाईन डेस्क - निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन (Abhishek- Aishwarya) यांच्या नावाची चर्चा होत असताना अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाचा विषय सुरु झाला. पण रिपोर्ट्सनुसार, हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले जात आहे आणि आता अभिषेक-ऐश्वर्या सोबत एक चित्रपट घेऊन येत आहेत. (Nimrat Kaur)
सोशल मीडियावर काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यांमध्ये कटुता आल्याचे म्हटले जात आहे. असे म्हटले जात आहे ती, दोघे घटस्फोट घेणार आहेत. पण कपल आणि बच्चन परिवाराकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता असे वृत्त समोर आले आहे की, दोघेजण ऑनस्क्रीन दिसणार असून एक चित्रपट घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक मणिरत्नम या कपलला पुन्हा एका चित्रपटात कास्ट करण्याच्या तयारीत आहेत. ही जोडी त्यांचाच चित्रपट गुरुमध्ये दिसली होती. (Abhishek- Aishwarya)
मणिरत्नम यांचा चित्रपट 'गुरु'मध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हा ते लग्न बंधनात अडकले होते. मणिरत्नम यांनी रावण चित्रपटात पुन्हा त्यांना कास्ट केले. आता रिपोर्टनुसार, तिसऱ्यांदा हे कपल एकत्र दिसणार असून एक दमदार कहाणी शोधण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अभिषेक बच्चनचा स्वत:चा मणिरत्नम यांच्यासोबतचा चौथा चित्रपट आहे. अभिषेक युवामध्ये दिसला होता.