यादिवशी रंगणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद-३'चा महाअंतिम सोहळा

Me Honar Superstar - Chhote Ustaad 3 | अभिजीत सावंत, रोहित राऊत, जुईली देणार साथ
Me Honar Superstar - Chhote Ustaad 3
मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद-३ चा फिनाले यादिवशी होणारinstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ९ आणि १० नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे.

पुण्याचा देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने, अहमदनगरचा सारंग भालके, यवतमाळची गीत बागडे आणि विरारच्या पलाक्षी दीक्षित आणि जुई चव्हाण या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय़ गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं.

महाअंतिम सोहळ्यात छोट्या उस्तादांना साथ देण्यासाठी अभिजीत सावंत, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, राधा खुडे खास हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ जाधव देखील या महाअंतिम सोहळ्यात धिंगाणा घालणार आहे. टॉप ६ स्पर्धकांमध्ये सुरांची महाजुगलबंदी देखील रंगणार आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद-३ चा महाअंतिम सोहळा येत्या ९ आणि १० नोव्हेंबरला रात्री ९ वाजता पाहता येईल.

Me Honar Superstar - Chhote Ustaad 3
Navri Mile Hitlerla | एजे लीलाला देणार गृहलक्ष्मीचा मान...!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news