Abhijeet Dipke - Mannat : ‘मैं शाहरुखका फॅन हूँ’, शाहरुखच्या ‘मन्नत’ बाहेर अभिजित दिपकेंची हवा!

शाहरुख खानच्या बंगल्यासमोर दिपके यांच्यासोबत चाहतीने काढला फोटो, मुंबई येथे आजपासून सीजेपीचे आंदोलन
Abhijeet Dipke - Mannat : ‘मैं शाहरुखका फॅन हूँ’, शाहरुखच्या ‘मन्नत’ बाहेर अभिजित दिपकेंची हवा!
Abhijeet Dipke - Mannat : ‘मैं शाहरुखका फॅन हूँ’, शाहरुखच्या ‘मन्नत’ बाहेर अभिजित दिपकेंची हवा!
Published on: 
Updated on: 

Abhijeet Dipke २ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. यानिमित्ताने ते आज मुंबई येथे पोहचले. दरम्यान ते अभिनेते शाहरुख खान याच्या प्रसिद्ध मन्नत बाहेर दिसून आले. दिपके दिसताच एक महिला कार थांबवते व दिपके यांच्याशी संवाद साधते व फोटोसाठी रिक्वेस्ट करताना दिसत आहे. यावेळी त्‍यांचे सहकारी सहज म्हणतात की शाहखूरच्या मन्नत समोर अभिजित दिपके यांचेच फॅन, यावर दिपके यांनी म्हटले की मला माफ कर शाहरुख मी अजूनही शाहरुखचा फॅन आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शाहरुख खानच्या 'मन्नत' या निवासस्थानाबाहेर दिपके दिसले होते, जिथे ते एका चाहतीला भेटले, जिने त्यांना भेटण्यासाठी आपली गाडी थांबवली होती. यावेळी ती म्हणाली की विशेष म्हणजे, ती म्हणाली की लोकांना शाहरुख खानपेक्षा अभिजीतमध्ये जास्त रस आहे. त्‍यावर अभिजीत दिपके म्हणाले की मी शाहरखचा फॅन आहे.या व्हिडिओ दिसते दिपके यांची चाहती 'ते करत असलेल्या कामाबद्दल' अभिजीतचे आभार मानते व त्याच्यासोबत फोटो काढायची इच्छा व्यक्त करताना दिसते

Abhijeet Dipke - Mannat : ‘मैं शाहरुखका फॅन हूँ’, शाहरुखच्या ‘मन्नत’ बाहेर अभिजित दिपकेंची हवा!
Abhijit Dipke : "मी रस्त्यावर पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन..." ; अभिजीत दिपकेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

यावेळी हा व्हिडीओ शूट करणारा कार्यकर्ता गंमतीने म्हणतो की 'भाऊच्या (अभिजीत) कारमुळे मन्नतसमोरील फॅन फॉलोइंग थांबत आहे, हे कसे होऊ शकते?' ' यावर अभिजीत दिपके गमतीने म्हणाले. की 'शाहरुख भाई फोन करत होते, संध्याकाळी भेटायला जाऊया'. आशुतोश रांका यांच्या इन्स्टावरुन हा व्हिडीओ अपलोड केला आहे.

शाहरुख खानशी तुलना

फोटो काढण्यासाठी आलेली महिला म्हणते की 'आज शाहरुखच्या मन्नतमध्ये कोणालाच रस नाही, माफ करा पण सगळे इकडे बघत आहेत', असे म्हणत तिने अभिजीतकडे बोट दाखवले. तिच्या या या कमेंटला उत्तर देताना अभिजीतने गंमतीने शाहरुखची माफी मागितली आणि म्हणाला, 'माफ करा शाहरुख भाई, पण मी अजूनही तुमचा खूप मोठा चाहता आहे.'

दरम्यान मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित दीपके म्हणाले की शुक्रवार, २ ऑक्टोबरपासून कॉकरोज जनता पार्टी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार, असा निर्धारही व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news