Aarti Solanki On Vidyanand Bapat : ‘माजोरडे, बिनडोक, दीड शहाण्या लोकांना वाटतंय...’; विद्यानंद बापट यांच्या भूमिकेवर आरती सोलंकीची टीकात्मक पोस्ट

Aarti Solanki On Vidyanand Bapat : डीजे बंदीच्या वादात अभिनेत्रीची उडी! आरती सोलंकीची विद्यानंद बापटांच्या भूमिकेवर खरमरीत पोस्ट
Aarti Solanki -Vidyanand Bapat
Aarti Solanki On Vidyanand Bapat over DJ Controversy
Published on
Updated on

पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गणेशोत्सव तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजे, ढोल-ताशे आणि लाऊडस्पीकरच्या वाढत्या आवाजावर आक्षेप घेत विद्यानंद बापट यांनी आवाजाची मर्यादा आणि डीजेच्या वापराबाबत ठाम भूमिका मांडली आहे. मात्र, या भूमिकेनंतर अभिनेत्री, कॉमेडियन आरती सोलंकीने या वादाच्या भोवऱ्यात उडी घेतली आहे. आरतीची इन्स्टाग्रामवरील पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

डीजे विरोधात माध्यमांशी बोलताना बापट यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. या घटनेनंतर सोशल मीडियासह विविध क्षेत्रांतून बापट यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी त्यांच्या ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिकेचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्या मागणीवर नाराजी व्यक्त केली. आता अभिनेत्री आरती सोलंकीनेही या प्रकरणावर भाष्य करत विद्यानंद बापट यांच्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

आरती सोलंकींची बापटांना ‘फार स्पष्ट मराठी’ न बोलण्याची विनंती

‘फू बाई फू’सारख्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या आरती सोलंकी आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखली जाते. यावेळी तिने विद्यानंद बापटच्या प्रकरणावर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलीय. आरतीने आपल्या पोस्टमध्ये बापट यांना उपरोधिक सल्ला दिला असून ‘फार स्पष्ट मराठी बोलू नका’ असं म्हटलं आहे.

आरती सोलंकीने म्हटलंय, विद्यानंद बापट हे डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात बोलत आहेत. मात्र, त्यांची भूमिका काही लोकांना चुकीच्या पद्धतीने समजत आहे. त्यांना बापट हे थेट गणपती बाप्पा किंवा गणेशोत्सवाच्या विरोधात बोलत असल्याचा गैरसमज होत असल्याचे तिने म्हटलं आहे.

‘हल्ला करणाऱ्याच्या शिक्षणाची आणि संस्कारांची कल्पना येते’

आरती सोलंकीने आपल्या पोस्टमध्ये विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही निषेध केला. बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या शिक्षणाबरोबरच त्याच्यावर झालेले संस्कारही या घटनेतून दिसून येतात, असा टोला लगावला. आपल्या पोस्टमध्ये आरतीने काहींना ‘असुशिक्षित’, ‘माजोरडे’, ‘बिनडोक’ आणि ‘दीड शहाणे’ असे म्हटले आहे.

Aarti Solanki -Vidyanand Bapat
The Traitors 2 Winner: 'धुरंदर'ची ही डान्सर बनली विजेती, कोण आहे रिदा थराना जिने अखेरच्या क्षणी गेम पलटवला?

विद्यानंद बापटांच्या अस्खलित मराठीचीही चर्चा

दरम्यान, डीजेविरोधातील भूमिकेसोबतच विद्यानंद बापट यांच्या बोलण्याच्या शैलीची आणि शुद्ध मराठीचीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते वापरत असलेले शब्द, वाक्यरचना आणि अस्खलित मराठी ऐकून अनेक नेटकऱ्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले आहे.

Aarti Solanki -Vidyanand Bapat
Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ची घोडदौड सुरूच; 2 कोटी बजेटच्या चित्रपटाने कसे कमावले 72 कोटी?

सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांवरून विविध प्रकारचे मीम्सही व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना बापट यांनी एका श्लोकाचा उल्लेख केला होता. त्यांची ही भाषाशैली नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यामुळे सध्या डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा जितका चर्चेत आहे, तितकीच विद्यानंद बापट यांच्या मराठी भाषेवरही सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news