पुढारी ऑनलाईन डेस्क - दिग्गज बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे आराध्या बच्चन हिच्या १३ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन सोहळ्यात दिसले नाही. रिपोर्टनुासर, इतकेच नाही तर केवळ ऐश्वर्या आणि आराध्याचे फोटो व्हायरल झाले असून अभिषेक बच्चन पार्टी फोटोत कुठेच दिसला नाही. बुधवारी रात्री, ऐश्वर्याने आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले. पण त्या फोटोंमध्ये बिग बी आणि अभिषेक बच्चन दिसले नाहीत. शिवाय, अमिताभ यांनी आराध्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील शेअर केलेल्या नाहीत, असे म्हटले जात आहे. मात्र त्यांनी एक ब्लॉगवर पोस्ट शेअर केली आहे.
ऐश्वर्याची कन्या आराध्या १३ वर्षांची झाली आहे. ऐश्वर्याने तिचे बर्थडे सेलिब्रेशन केले आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटोंमध्ये अभिषेक बच्चन आणि बच्चन परिवारातील कुणीच दिसले नाही. त्यामुळे ॲश-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाली आहे.
आराध्याचा वाढदिवस १६ नोव्हेंबर रोजी असतो तर ऐश्वर्याच्या वडिलांचा जन्मदिवस २१ नोव्हेंबर रोजी आहे. ऐश्वर्याने आराध्याचे पार्टी फोटो तसेच तिच्या आईच्या घरातील काही फोटो शेअर केले आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये बच्चन परिवारातील सदस्य दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं की, आराध्या आमच्या मनात आहे. त्यांनी शेअर केलं की- 'वाढदिवस नेहमीच असेल.. वाढदिवस शुभेच्छांसाठी येतो..पण याविषयी कुणी बोलत नाही. ते सर्व आमच्या मनात राहतील.'
दरम्यान, आराध्याच्या वाढदिवसादिवशी पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोवरून वाटते की, वाढदिवसाच्या पार्टीची थीम डिस्को होती. ॲशने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'तू अधिकृतरित्या एक टीनएजर झाली आहेस. माझी प्रेमळ आराध्या....माझी आत्मा...नेहमी खुश राहा.'