

आमीर खानच्या सितारे जमीन परची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आमीर खान जवळपास 3 वर्षांनी कमबॅक करणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी Amazon Prime ची 120 कोटींची ऑफरही त्याने नाकारली आहे. हा सिनेमा थिएटर रिलीजसाठी आमीर आग्रही होता. (Entertainment News Update)
या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर समोर आले की हा सिनेमा 2018 साली आलेल्या चॅम्पियन या स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाचा फ्रेम टू फ्रेम मॅच करून पाहिले असता हा सिनेमा अगदी सेम असल्याचे चाहत्यांचे मत होते. यावर बॅन करण्याची मागणीही केली गेली होती.
ओरिजिनल सिनेमा जेवियर फेसर यांनी दिग्दर्शित केला आहे. जेवियर गुटिरेज एथेनिया, माता जुआन, मार्गालो यांनी या सिनेमात काम केले आहे. त्यावेळी या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर या सिनेमाचे अनेक रिमेक झाले.
चॅम्पियन 2018 मध्ये रिलीज झाला होता. याचा रिमेक 2021 मध्ये सौदीमध्ये बनला. यानंतर जर्मनमध्ये वील विर चैंपियंस सिंड यानावाने 2022 मध्ये पुन्हा एकदा त्याचा रिमेक बनला. यानंतर लगेच 2023ला लगेचच सितारे.. ची घोषणा झाली होती.
हा सिनेमा आरएस प्रसन्ना यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. या सिनेमात आमीरच्या आईने 90 व्या वर्षी डेब्यू केला आहे. आमीरची बहीणही या सिनेमाचा भाग आहे. याशिवाय जिनीलिया डिसूजा देशमुख, गोपी कृष्ण वर्मा, समवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी , आशिष पेंडसे हे या सिनेमाचा भाग आहेत.
आमीरचा हा सिनेमा 20 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर येत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या कौतूक केले आहे.