

हिना खानला पाकिस्तानी युजर्सकडून शिव्या, अपमानजनक शब्द आणि अश्लील मेसेज येत आहेत. यावर हिना खानने जे सडेतोड उत्तर दिलंय...ते पाहाच..
Hina Khan Angry Response Pakistani social media users
मुंबई : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, बॉलीवूड स्टार्सनी प्रतिक्रिया देत भारतीय लष्कराचे समर्थन कले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये टीव्ही अभिनेत्री हिना खानने देखील आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने शांती ठेवण्याचे आवाहन केले होते. तसेच भारतीय लष्कराचे आभार मानले होते. या पोस्ट नंतर हिनाला पाकिस्तानी फॉलअर्स अनफॉलो करू लागले. आणि धमक्या दोऊ लागले.
हिना खानने देखील पाकिस्तानी युजर्सना चपराक लगावली आहे. तिने एक पोस्ट शेअर करत त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. हिनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही स्पोट पाहायला मिळेल.
हिना खानने पोस्टमध्ये लिहिलंय, 'मी माझं संपूर्ण आयुष्य सीमेपार लोकांशी केवळ प्रेमचं केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी आणि नंतर माझ्या देशाचे समर्थन करण्यावरून मला तुमच्यापैकी अनेक लोकांनी शिव्या दिल्या, टीका केली, अनेकांना अनफॉलो देखील केलं. इतकचं नाही, तर अनेकांनी मला अनफॉलो केलं आणि धमकी देखील देत आहेत. या धमक्यांसोबत शिवाय, अश्लील मेसेज आणि अपमानजनक शब्द वापरत आहेत. जे केवळ द्वेष दाखवते. तुमचे हे शब्द माझे आजारपण, परिवार आणि माझ्या धर्मासाठी देखील आहेत.'
हिनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितलं की, पाकिस्तानी फॅन्स शिव्या देत धमक्यांनी भरलेले मॅसेज पाठवत आहेत. हिनाने पोस्ट शेअर करत सडेतोड उत्तर दिले आहे. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान हिनाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर करून म्हटले आहे की, तिला 'अनफॉलो' केल्याने काहीच फरक पडत नाही.