अभिनेता आमीर खानने आता स्वत:चे युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. जनता का थिएटर असे या यूट्यूब चॅनेलचे नाव आहे. या चॅनेलच्या माध्यमातून आमीर खान प्रोडक्शनचे सगळे सिनेमे पाहता येणार आहेत. केवळ 100 रुपये शुल्क देऊन आमीरचे हे सिनेमे पाहता येणार आहे. सिनेमाच्या रिलीजनंतर हे सिनेमे या यूट्यूब चॅनेलवर पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. (Latest Entertainment News)
साधारणपणे भारतात कोणताही सिनेमा रिलीज झाला की काही काळाने तो ott चॅनेल्सवर पाहण्यासाठी उपलब्ध होतो. आमीरने मात्र हा पायंडा बदलण्याचे ठरवले आहे. ओटीटी चॅनेल्सबाबत बोलताना तो म्हणतो, 'मला OTT चं गणित कळालंचं नाही. मला अनेक OTT चॅनलल्सनी सिनेमा त्यांच्या platform वर टाकण्यासाठी अनेक मोठी रक्कम दिली होती मात्र मी त्याला थेट नकार दिला. मला OTT चॅनलने देऊ. केले १२५ कोटी नको आहेत मला माझ्या एक एक प्रेक्षकांचे फक्त १०० रुपये पाहिजे आहेत' अस थेट विधान हे आमिर ने केलं आहे.
आमीर पुढे म्हणतो, आज अनेकजण वेगवेगळ्या कारणाने थिएटरपर्यंत पोहचू शकत नाहीत. तर अनेकांच्या गावात थिएटर उपलब्ध नसते. अशांसाठी जनता का थिएटर हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कोविडनंतर थिएटरवर जाऊन सिनेमा पाहणे या काळात कमी झाले आहे. स्मार्टफोनने यात भर घातली आहे. तसेच भारतात अनेक चांगल्या कंटेंटला थिएटर मिळत नाही. त्यांच्यापाठी कोणते बलाढ्य प्लॅटफॉर्मही नसतात. अशा कंटेंटला प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या माध्यमातून मिळू शकेल.
आमीरचा सितारे जमीन पर हा सिनेमा आता युट्यूबवर पाहता येणार आहे. 100 रुपये शुल्क देऊन 30 दिवसांसाठी हा सिनेमा संबंधित अकाऊंटवर राहील. पण एकदा का सिनेमा पाहायला सुरू केला की 48 तासांची मुदत हा सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध असेल.