Aamir Khan Marriage: तारीख ठरली! आमिर खान ६१ व्या वर्षी पुन्हा अडकणार लग्नाच्या बंधनात..

Aamir Khan Marriage
Aamir Khan Marriagepudhari
Published on
Updated on

Aamir Khan Marriage: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. कुटुंबीयांच्या जवळ असलेल्या एका सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार आमिर आणि गौरी एक कुटुंब म्हणून वर्षभरापासून एकत्र रहात आहेत. या दोघांनी आनंदी, स्थीर आयुष्य निर्माण केलं आहे. ते आता याला अधिकृत दर्जा देणार आहेत. कुटुंबियांसमवेत हा सोहळा होण्याची शक्यता आहे. आमिर आणि गौरी यांचे लग्न ५ जुलै रोजी आमिर खानच्या घरी होण्याची शक्यता आहे.

Aamir Khan Marriage
3 Idiots 2 : आमिर खानने दिलं सरप्राइज; पुन्हा परतणार रॅंचो, राजू आणि फरहानची जादू

४७ वर्षाच्या गौरी यांना क्विन या आधीच्या नवऱ्यापासून सात वर्षाचा मुलगा आहे. गौरी यांचे आजोपा फिल्प स्प्राट हे ब्रिटनमध्ये जन्मले होते ते १९२० मध्ये भारतात आले. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत देखील सहभाग घेतला होता. आता त्यांची नात भारताशी घरोबा करणार आहे.

Aamir Khan Marriage
Hiran Chatterjee | आमदार, अभिनेत्यानं मुलीच्या वयाच्या मॉडेलशी केलं दुसरं लग्न, स्वत:ची मुलगी म्हणाली- 'बाप म्हणून फेल...'

आमिर आणि गौरी यांनी नवीन नात्यात येताना आपण पूर्णपणे प्रेमाने आणि दोघांच्या कुटुंबियांच्या पाठिंब्याने या नात्यात येत आहोत असं सांगितलं होतं. आमिर खानने यापूर्वी रीना दत्तासोबत विवाह केला होता. रीनापासून आमिर खानला जुनैद आणि इरा अशी दोन मुलं आहेत. रीनाला घटस्फोट दिल्यानंतर त्याने चित्रपट निर्माती किरण राव सोबत दुसरं लग्न केलं होतं. किरण आणि आमिर यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. मात्र या दोघांनी २०२१ मध्ये सामंजस्यानं घटस्फोट घेतला. त्यांनीच शांततेत आणि परस्पर सामंजस्यानं घटस्फोट घेण्याचा ट्रेंड सेट केला.

Aamir Khan Marriage
Not love jihad : Mahakumbh girl Monalisa | ट्रोल झाल्यानंतर मोनालिसा स्पष्टच म्हणाली, 'लव्ह जिहाद नाही; प्रत्येक धर्माचा आदर..'

यानंतर आता आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. यावेळी मात्र त्याने कोणतीही पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले नाही. त्याने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. यावेळी फक्त दोन व्यक्ती, दोन कुटुंबीय आणि ५ जुलैची तारीख समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news