'हॉटेलमध्ये बोलावून कपडे उतरवले अन् नंतर न्यूड...!' 'मॉलिवूड'ची डर्टी स्टोरी

Mollywood #MeToo : दिग्दर्शकाने न्यूड फोटो काढले
Mollywood #MeToo, Malayalam film director Ranjith
मल्याळम चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मल्याळम चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणांच्या (Mollywood #MeToo) आरोपाने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मल्याळम चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोझिकोडे येथील एका तरुणाचा जबाब नोंदवला. त्या तरुणाने दिग्दर्शक रंजित (Malayalam film director Ranjith) यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे.

२०१२ मध्ये बंगळूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दिग्दर्शक रंजितने त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुणाने केला आहे. त्याने या प्रकरणी बुधवारी तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने एसआयटीने पीडित तरुणाचा जबाब नोंदवला.

सदर तरुणाने आरोपाचा आहे की तो २०१२ मध्ये रंजितला 'बावुटीयीदे नमाथिल'च्या सेटवर भेटला. यावेळी रंजितने त्याचा फोन नंबर दिला आणि नंतर त्याला बंगळूरला येण्यास सांगितले. या प्रकरणी एसआयटी पथकातील सदस्या केरळ पोलिस अकादमीच्या सहाय्यक संचालक ऐश्वर्या डोंगरे यांनी मलूरकुन्नू एआर कॅम्पमध्ये त्याचा जबाब नोंदवला.

हॉटेल रूममध्ये बोलावून कपडे उतरवले

बंगळूर येथे त्याला दिग्दर्शकाने त्याच्या हॉटेल रूममध्ये बोलावले होते. तिथे पोहोचल्यावर त्याला ड्रिंक्स प्यायला दिले. त्यानंतर जबरदस्तीने कपडे उतरवले आणि लैंगिक अत्याचार केले, असा आरोप तरुणाने केला आहे.

लीड रोल देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कोची पोलिसांत दाखल झालेल्या एका तक्रारीनुसार, पीडितेला ऑडिशनच्या बहाण्याने बंगळूर येथील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. रंजीतने त्याचे कपडे उतरवण्यास भाग पाडले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला या बदल्यात त्याला चित्रपटात लीड रोल देण्याचे आमिष दाखवले. पीडितने दावा केला की त्याचा समज होता की हा ऑडिशन प्रक्रियेचा एक भाग होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पैशाची ऑफरदेखील देण्यात आली.

दिग्दर्शकाने न्यूड फोटो काढले

रंजितने त्याचे न्यूड फोटो काढले आणि नंतर ते त्याने मल्याळम सिनेमात अभिनेत्री असलेल्या एका महिला मैत्रिणीकडे पाठवले, असा आरोपही त्याने केला. त्याने केलेल्या आरोपाला पुष्टी म्हणून पुरावेही सुपूर्द केल्याचे तरुणाने शुक्रवारी सांगितले. दरम्यान, तपास पथकाने एका ज्युनियर आर्टिस्टचा जबाबही नोंदवला आहे. डवेला बाबूने तिसोबत गैरवर्तन केल्याचे तिने सांगितले होते.

रंजीतवर अभिनेत्रीचा बलात्काराचा आरोप

रंजीतवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे हे दुसरे प्रकरण आहे. यापूर्वी बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तिने तक्रारही दाखल केली होती. कोची पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या अनुषंगाने एफआयआर नोंदवला. कोचीमधील एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे. दरम्यान, रंजितने हे फेटाळून लावले आहेत. त्याने म्हटले आहे की मित्रा हिला 'पलेरी माणिक्यम' चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावले होते. पण त्यांनी ठरवले की ती या रोलसाठी योग्य नाही आणि तिला परत पाठवले.

हेमा समितीच्या रिपोर्टनंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ

के. हेमा समितीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतचा के. हेमा समितीचा रिपोर्ट केरळ सरकारला सादर करण्यात आला होता. तब्बल पाच वर्षांनी १९ ऑगस्ट २०२४ रोजी हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला. या रिपोर्टमधून लैंगिक शोषण, बेकायदेशीर बंदी, भेदभावाची वागणूक, ड्रग्ज आणि दारु प्यायला देऊन शोषण, मानधनातील असमानता आदी गोष्टी उघड करण्यात आल्या आहेत.

Mollywood #MeToo, Malayalam film director Ranjith
"शरीराचा सौदा नाही तर कामदेखील नाही,'' शोभा डे संतापल्या

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news