sonalee kularni video : सोनाली थिरकली पतीसोबत, मरून रंगाच्या ड्रेसमध्ये जलवा

पुढारी ऑनलाईन : मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kularni)’झिम्मा’ आणि ‘पांडू’ हा चित्रपटाला चाहत्यांचा खूपच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तिची केळीवालीची भूमिका चांगलीच गाजत आहे. तर दुसरीकडे तिने पती कुणालसोबत नववर्षाचं स्वागत झक्कास केलं आहे. यासोबत तिने निसर्गरम्य ठिकाणीचे फोटो देखील शेअर केले आहेत. (sonalee kularni)
सोनाली कामानिमित्त अनेकदा मुंबईत असते. परंतु, तिचा पती कुणाल दुबईत आणि सासूसासरे लंडनमध्ये असतात. गेल्या २०२१ ख्रिसमसच्या निमित्ताने सोनाली तिच्या सासरी लंडनला गेली होती. यावेळी तिने ‘पांडू आणि ‘ झिम्मा’ चित्रपटाच्या आनंदासोबत येणाऱ्या नववर्षाचे जंगी स्वागत केले आहे. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नववर्षाचे स्वागत करताना तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘Happy new year’ असे लिहिले आहे. या फोटोत तिने आकाशी आणि पांढऱ्या रंगाच्या डेनिममध्ये ती दिसत आहे. याशिवाय तिने एक व्हिडिओ शेअर करत ‘अलविदा’ या गाण्यावर डान्स केला आहे.
याशिवाय सोनाली ( Sonali Kulkarni video ) कुणालसोबत एका व्हिडिओत दिसली. या व्हिडिओत सोनाली आणि कुणाल निसर्गरम्य ठिकाणी असून दोघांनी ‘पांडू’ चित्रपटातील बुरूम- बुरूम गाण्यावर थिरकले आहेत. यावेळी दोघांची केमिस्ट्रीने चाहत्यांना भारावून गेले आहे.
नुकतेच सोनालीने मुरून रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘#throwback’ असे लिहिले आहे. दिवसेंदिवस तिच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे. या फोटो आणि व्हिडिओत ती खुपच सुंदर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनवरून हा तिचा फोटो जुना असल्याचे समजते आहे.
हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.याशिवाय काही चाहत्यांनी ‘मदन पिचकारी’, ‘क्यूट’, ‘सुंदर’ आणि ‘ग्लॅमरस’ सारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. दुसऱ्या एकाने तिच्या साडीवरील फोटोला ‘मराठी सिनेमा मोठा आपल्यामुळे झाला’ असे लिहिले आहे.
नुकताच सोनालीचा ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सोनालीने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आत्तापर्यंत तिने मराठीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या वर्षी २०२१ मध्ये सोनाली आणि कुणालने दुबईत विवाहबंधनात अडकले होते.
हेही वाचलंत का?
- भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘या’ पेन्शन योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळतील 27000 हजार
- Corona Update : सात महिन्यांनी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत उच्चांकी नोंद
- भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘या’ पेन्शन योजनेत गुंतवणूक करा, दरमहा मिळतील 27000 हजार
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram