कोल्हापूर : कळंबा जेलमधील कैद्याच्या खून प्रकरणी ६ जणांवर खुनाचा गुन्हा | पुढारी

कोल्हापूर : कळंबा जेलमधील कैद्याच्या खून प्रकरणी ६ जणांवर खुनाचा गुन्हा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची सदा भोगणाऱ्या कळंबा कारागृहातील कैद्यावर हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी पुण्यातील तीन नामचीन गुंडासह 6 जणांवर शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून झालेल्या कैद्याच्या नातेवाईकानी शासकीय रुग्णालय आणि राजवाडा पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केल्याने सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता

सचिन राजाराम ढोरे पाटील (वय 35 रा. पुणे) अक्षय तुकाराम काळभोर (30 रा. पुणे) इलियास मुसा मुल्ला (वय 35 रा. सांगली ) बबलू संजय जावीर (वय 32 रा. कोल्हापूर) किरण उर्फ करण प्रकाश सूर्यवंशी (38 रा. खानापूर जि. सांगली) आणि शिवाजी तीपन्ना कांबळे (वय 40 रा. कोल्हापूर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संशयित सचिन ढोरे पाटील, बबलू जावीर आणि अक्षय काळभोर हे मोक्कांतर्गत कारवाईतील आरोपी आहेत, तर शिवाजी तीपन्ना कांबळे हा खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे.

जीवघेण्या हल्ल्यात निशिकांत बाबुराव कांबळेचा मृत्यू

कारागृहातील संशयित हल्लेखोरांनी गुरुवारी सायंकाळी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात निशिकांत बाबुराव कांबळे (वय 47 रा. आंबेडकर चौक फिरंगाई मंदिराजवळ शिवाजी पेठ कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सहा संशयित केल्यावर भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमाराला संशयित शिवाजी कांबळे आणि कैदी निशिकांत कांबळे यांच्यात वादावादी झाली. शिवाजी कांबळे याने निशिकांतला आईवरून शिवी हसडल्याने तो कमालीचा संतप्त झाला. त्याने पाण्याच्या नळाजवळील फरशी उखडून शिवाजी कांबळेच्या दिशेने भिरकावली. शिवाजीने फरशी हाताने रोखण्याचा प्रयत्न केला त्यात हाताला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. यानंतर दोघात पुन्हा हाणामारी झाली

शिवाजी कांबळेने कारागृहातील अन्य सहकारी साथीदारांना बोलावून घेतले. निशिकांत आणि शिवाजीसह साथीदार यांच्यात पुन्हा धुमश्चक्री उडाली. त्यात शिवाजी कांबळेसह ६ कैद्यांनी निशिकांतवर हल्ला चढवला, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. शिवाय जमीनीवर खाली पाडून त्याच्या छातीवर पोटावर ठोसे लगाविण्यात आले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे निशिकांत कांबळे याचा रक्तदाब कमी झाला प्रकृती गंभीर बनल्याने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

पोलीस यंत्रणेची तारांबळ

गुरुवार रात्री घडलेल्या घटनेने काराग्रह आणि पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली होती. कळंबा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी कारागृहातील रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर सहा संशयित निशिकांत कांबळे याला मारहाण करीत असल्याचे चित्रित झाले होते. त्यामुळे खुनाचा प्रकार उघडकीला आला.

कैद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या निशिकांत कांबळे याच्या मृतदेहाची मुख्य न्यायदंडाधिकारी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय तज्ञांच्या साक्षीने दुपारी उतरणे तपासणी करण्यात आली त्यानंतर मृतदेहाचा ताबा निशिकांतचा भाऊ दिलीप कांबळे व कुटुंबाकडे देण्यात आला यावेळी निशिकांतचे नातेवाईक मोठ्या संख्येने शासकीय रुग्णालय आवारात जमा झाले होते.

तणावाची स्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त पाचारण करण्यात आला होता खुनातील सहाही हल्लेखोरांना लवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button