अल्‍लू अर्जुन
अल्‍लू अर्जुन

अल्‍लू अर्जुन या साऊथ स्टारचा ‘पुष्पा’ 300 करोड क्‍लबमध्ये

Published on

पुढारी ऑनलाईन

तेलगू स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा : द राइज' या चित्रपटाने जगभरातून 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. यापैकी 200 कोटींची कमाई एकट्या भारतातील आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 56.69 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.

हा चित्रपट तमीळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड आणि हिंदी भाषांत 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, यानिमित्त बोलताना अल्लू अर्जुन याने बॉलीवूडमधील पदार्पणाबाबत वक्तव्य केले.

तो म्हणाला की, बॉलीवूडमध्ये ऑफर मिळत राहतात; पण निश्‍चित काही नाही. इतर भाषिक इंडस्ट्रीत काम करणे धाडसाचे काम आहे. आशा आहे की, हे घडून येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news