दाक्षिणात्य स्टार धनुष उतरणार दिग्दर्शनात | पुढारी

दाक्षिणात्य स्टार धनुष उतरणार दिग्दर्शनात

पुढारी ऑनलाईन

अभिनेता धनुषने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह हिंदीतही स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. धनुष एक चांगला अभिनेता तर आहेच, शिवाय आता तो दिग्दर्शनातही पदार्पण करत आहे. त्याने नुकतेच त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘सर’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

तमिळ आणि तेलगू भाषेत हा चित्रपट बनवला जाणार आहे. सामाजिक मुद्द्यावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन धनुष करत आहे. एक युवक शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात लढताना दिसेल. दरम्यान, सध्या धनुष ‘अतरंगी रे’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट दि. 24 डिसेंबर रोजी ओटीटीवर येत आहे.

Back to top button