Dilip Kumar birth anniversary: ‘हम साथ थे, हैं और रहेंगे’ सायरा बानो झाल्या भावूक | पुढारी

Dilip Kumar birth anniversary: ‘हम साथ थे, हैं और रहेंगे’ सायरा बानो झाल्या भावूक

पुढारी ऑनलाईन

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची आज ११ डिसेंबर रोजी ९९ वा जन्मदिन आहे. (Dilip Kumar birth anniversary) यानिमित्ताने त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. सायरा बानो यांनी दिलीप यांच्यासाठी एक भावूक पोस्ट लिहिलीय.

Saira Banu on her marriage to Dilip Kumar - Rediff.com movies

अनेक वर्ष दिलीप कुमार आजारी होते. दिलीप कुमार यांचे ७ जुलै २०२१ रोजी निधन झालं. सायरा बानो यांनी पत्र लिहून दिलीप यांना बर्थडे विश करताना लिहिलंय- आम्ही एकत्र होतो, आहे आणि नेहमी राहू. मी आता एकटी नाहीये.

Dilip Kumar-Saira Banu romance: Married for 54 years, how they weathered 'a great mistake' | Entertainment News,The Indian Express

मध्यंतरी सायरा यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हटलं होतं-ते आमच्यामध्ये आहेत. हळूवार माझा हात पकडत आहेत. आणि आपल्या भावना न बोलता व्यक्त करत आहेत. मला माहिती आहे की, आता आणि नेहमीसाठी मी कधीच एकटी नसेन.

दिलीप कुमार यांनी १९६६ मध्ये अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी ११ ऑक्टोबर, १९६६ रोजी वयाच्या ४४ व्या वर्षी लग्न केलं होतं. १९४४ मध्ये दिलीप यांनी ज्वार भाटा या चित्रपटातून चित्रपट करिअरला सुरूवात केली होती.

Dilip Kumar and Saira Banu: A love story for the ages - Movies News

त्यांनी पुढे दाग, मुगल ए आजम, मशाल, शक्ति, देवदास, गंगाजमुना, नया दौर, मधुमति, क्रांति, कर्मा राम औऱ श्याम, नदिया के पार, अमर यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. या दिग्गज अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट किला हा १९९८ मध्ये रिलीज झाला  होता.

Back to top button