Tanishaa Mukerji
मनोरंजन
काजोलची बहिण तनिषा मुखर्जीचे पुनरागमन
पुढारी ऑनलाईऩ
अभिनेत्री तनिषा मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून लांबच आहे. बहीण काजोल आणि आई तनुजा यांच्यासारखे यश तिला लाभले नाही. काही चित्रपटांत भूमिका केल्यानंतर ती बॉलीवूडमधून गायब झाली होती. मधल्या काळात ती 'बिग बॉस,' 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. आता तनिषा पुनरागमन करीत आहे. 'कोड नेम अब्दुल' या चित्रपटातून तनिषाचे पुनरागमन होत आहे. या चित्रपटात तनिषाने एका मुस्लिम महिलेची व्यक्तिरेखा साकारली आहे. एका मिशनच्या पूर्ततेची जबाबदारी तिच्यावर आहे. हा चित्रपट 10 डिसेंबर रोजी रीलिज होत आहे.

