taapasee pannu
taapasee pannu

तापसी, प्रतीक शोधणार वधू

Published on

पुढारी ऑनलाईन

तापसी पन्‍नूचे या वर्षात अनेक चित्रपट रीलिज झाले आहेत. त्यातच तिच्या आणखी एका चित्रपटाचीही घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे नाव आहे, 'वो लडकी है कहाँ.' या कॉमेडी चित्रपटात तापसी पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत असून, ती अभिनेता प्रतीक गांधींची हरवलेली वधू शोधणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर याधीच रीलिज झाले आहे. या पोस्टवर तापसी हातात मॅप पकडून पोलिसाच्या वेशात असलेली दिसते. तर, प्रतीक लग्नातील वराच्या वेशात दिसतो आणि त्याच्या हातात दुर्बीण आहे. प्रतीक एका पारंपरिक व्यक्‍तीची भूमिका यात साकारत आहे. जयपूरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अर्षद सय्यद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news