‘दिल रख ले, नींद तो वापस दे’ अखेर श्रद्धा कपूरने केला रिलेशनशीपचा खुलासा

Shraddha Kapoor
Shraddha Kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयासोबत हटके स्टाईलने नेहमीच चर्चेत असते. दरम्यान श्रद्धा कपूर काही दिवसांपासून 'तू झूठी मैं मकार'चे लेखक राहुल मोदी यांना डेट करत असल्याची माहित समोर आली होती. आतापर्यंत दोघांनीही याबाबतचा कोणीतीही अधिकृत्त माहिती दिलेली नव्हती. आता मात्र, श्रद्धाने सोशल मीडियावर रिलेशनशीपचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर राहुल मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्रद्धाने व्हाईट रंगाचा टॉप आणि राहूलनेही व्हाईट रंगाचा शर्ट परिधान केलाय. मात्र, या फोटोत राहूल रागाने पाहताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय आहे की, 'दिल रख ले…नींद तो वापस दे दे यार।'. यासोबत तिने राहुल मोदींना टॅग करून एक हार्ट इमोजी शेअर केला आहे. यावरून श्रद्धा कपूर राहुल मोदीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलीकडेच अंबानी फॅमिली फंक्शनमध्ये श्रद्धा कपूर राहुल मोदींसोबत दिसली होती. मात्र, यानंतर तिने किंवा याच्या आधीही त्याच्या नात्याचा खुलासा केला नव्हता. आता मात्र, श्रद्धा स्वत: च सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news