‘हमारे बारह’ प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने दिला हिरवा सिग्नल!

हमारे बारह चित्रपट
हमारे बारह चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हमारे बारह' चित्रपट आता रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट २१ जून रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. बॉम्बे हायकोर्टाने बुधवारी सुनावणीनंतर काही अटींसह चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली.

अधिक वाचा –

हमारे बारहमधील वादग्रस्त सीन्स हटवले जाणार 

चित्रपट 'हमारे बारह'च्या वादानंतर चित्रपट रिलीज साठी तयार आहे. २१ जूनला चित्रपटगृहात पाहता येईल. चित्रपट निर्मात्यांनी कोर्टाला सांगितले की, ते आक्षेपार्ह सीन्स हटवतील. त्यानंतर कोर्टाने सांगितले की, तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू शकता. या चित्रपटावर बंदी आणण्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. याचिकेत म्हटले होते की, या चित्रपटात मुसलमान आणि इस्लामला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. यावर आज कोर्टाने सुनावणी करत चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा केला.

अधिक वाचा –

अटींसह हमारे बारह प्रदर्शित होण्यास मंजूरी

शिवाय या चित्रपटामध्ये कुराणमध्ये लिहिलेल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप होता. यावर चित्रपट निर्मात्यांनी म्हटले की, ज्या गोष्टी वादग्रस्त मानल्या जात आहेत, त्या आम्ही चित्रपटातून हटवू. जस्टिस बीपी कोलाबावाला आणि जस्टिस फिरदौस पूनीवाला यांच्या खंडपीठांतर्गत सुनावणी दरम्यान दोन्ही पक्ष काही अटीनंतर तयार झाले. यामध्ये काही संवाद आहेत, ज्यावर वाद होऊ शकतो; ते रद्द केले जावेत. कुराणमधील काही 'आयत'चा उल्लेख होता, तो देखील काढला जावा. शिवाय, चित्रपटामध्ये १२ सेकंदाचे दोन डिस्क्लेमर दाखवण्याचादेखील निर्णय झाला.

इतकेच नाही तर हायकोर्टाच्या खंडपीठाचे म्हणणे होते की, 'हमारे बारह' चित्रपट महिला सशक्तीकरण दर्शवते. हा चित्रपट तार्किकदृष्ट्या पाहणे आणि समजून घ्यायला हवा. भारताची जनता समजूतदार आहे.

अधिक वाचा-

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेते अन्नू कपूर आहेत. अदिती धीमन ही अभिनेत्री देखील चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news