‘दिसते मी भारी फोटो माझा काढ’..गुलाबी साडीत सोनाली कुलकर्णीची अदा

Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णीने 'येऊ कशी प्रिया' गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. यामध्ये ती कोरिओग्राफर आशिष पाटील सोबत डान्स करताना दिसली होती. आता सोनालीने नवा फोटोशूट करून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचे मनमोहक सौंदर्य कमालीचे दिसत आहे. गुलाबी साडीत ती आणखी सुंदर दिसतेय. तिचे सालस सौंदर्य पाहातचं राहावं असं आहे.

अधिक वाचा –

गळ्यात भरजरी ज्वेलरी, कानात धुमके, हातात बांगडी, केसांचा अंबाडा, त्यात गजरा माळलेला, कपाळावर टिकली, लाईट मेकअप असा तिचा लूक परिपूर्ण दिसतोय. वनसाईड पदर आणि स्लिव्हलेस बलाऊजमध्ये ती आणखी खुलून दिसतेय.

अधिक वाचा –

सोनालीने ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी तिने मॉडर्न ड्रेसमधील फोटो शेअर केले होते. या वेस्टर्न लूकला दिलेली कॅप्शनने अधिक लक्षवेधी ठरली होती. अभिनेत्रीने बॉडी शेमिंगचा शिकार होणाऱ्या महिलांना यातून खास सल्ला दिला होता. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'त्या सर्व महिलांसाठी ज्यांना त्यांच्या शरीराच्या प्रकारामुळे ट्रोल करण्यात आले- जाड किंवा बारीक असणे ही तुमची निवड आहे, तुमच्या शरीरावर प्रेम करणे हा तुमचा अधिकार आहे, जे लोक त्यांची मतं तुमच्यावर लादतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा… तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या'. अभिनेत्रीने या कॅप्शनमध्ये शेवटी एक टीपही दिली होती की, 'ट्रोल करनेवाले कभी डरते नही'.

अधिक वाचा –

बोल्ड फोटोंमुळे सोनालीन वेधलं होतं लक्ष

सोनालीने लाल रंगाच्या बॉडीसूटमध्ये फोटोशूट करून सर्वांचे लक्ष वेधलं होतं. तिने या सूटवर एक पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. तिच्या या फोटोशूटवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या काही जणांनी तिचे कौतुक केले तर काहींनी टिच्यावर टीका केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news