Actor Darshan case : इलेक्‍ट्रिक शॉक दिला, जीभ कापली…पोस्‍टामार्टम रिपोर्ट मध्ये धक्‍कादायक माहिती समोर

Actor Darshan case
Actor Darshan case

पुढारी ऑनलाईन : कन्नड चित्रपटसृष्‍टी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इथल्‍या चित्रपट विश्वातील मोठ्या अभिनेत्‍यांमधील एक असलेल्‍या दर्शनला गेल्‍या आठवड्यात पोलिसांनी एका हत्‍येच्या प्रकरणात अटक केली होती. हे प्रकरण दर्शनचाच एक चाहता रेणुकास्‍वामीच्या हत्‍येशी संबंधीत आहे. रेणुकास्‍वामीच्या हत्‍येच्या प्रकरणात तपास करत असलेल्‍या पोलिसांनी सांगितले की, त्‍या चाहत्‍याने दर्शनची जवळची मैत्रिण पवित्राला आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. त्‍यामुळे संतापलेल्‍या दर्शनने रेणुकास्‍वामी नावाच्या व्यक्‍ती विरोधात सुपारी देउन त्‍याची हत्‍या करवली.

पोलिसांनी केलेल्‍या खुलाशानुसार दर्शनने ज्‍यांना सुपारी दिली, त्‍या लोकांच्या ताे सतत संपर्कात होता. इतकेच नाही तर रेणुकास्‍वामीचे अपहरण करून त्‍याला पहिल्‍यांदा दर्शनजवळ आणण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी दर्शन आणि पवित्रासह १७ लोकांना अटक केली आहे. आता रेणुकास्‍वामीच्या पोस्‍टमार्टम रिपोर्टमध्ये धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

इलेक्‍ट्रिक शॉक देउन केला छळ

आज (सोमवार) पोलिसांनी सांगितले की, रेणुकास्‍वामीची हत्‍या करण्याआधी त्‍याला इलेक्‍ट्रिक शॉक देउन टॉर्चर करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी धनराज नावाच्या व्यक्‍तीला अटक केली, तो एक केबल चालक आहे. धनराजने पोलिसांना सांगितले की, या प्रकरणातील आणखी एकाने त्‍याला बेंगळुरूला गोडाउनमध्ये बोलावले. ज्‍या ठिकाणी त्‍यांनी रेणुकास्‍वामीला शॉक देण्यासाठी एका उपकरणाचा वापर केला. पोलिसांनी ते उपकरणही जप्त केले आहे.

पोस्‍टमॉर्टम मध्ये समोर आल्‍या धक्‍कादायक गोष्‍टी

याआधी समोर आलेल्‍या माहितीत सांगितले होते की, रेणुका स्‍वामीच्या पोस्‍टमार्टम करणाऱ्या डॉक्‍टरांना त्‍याच्या शरीरावर तप्त लोखंडी रॉडने डाग दिल्‍याचे व्रण दिसले होते. डॉक्‍टरांनी सांगितले की, त्‍याचे नाक, जीभ कापून टाकण्यात आली होती. तसेच जबडाही तोडून टाकण्यात आला होता. तसेच शरीरातील अनेक हाडे मोडल्‍याचे समोर आले होते. त्‍याच्या कवटीवर देखील फ्रॅक्‍चरचे व्रण मिळाले आहेत.
कन्नड चित्रपट उद्‍योगातील आघाडीचा अभिनेता दर्शन आणि १२ अन्य लोकांना पोलिसांनी या प्रकरणात मागच्या मंगळवारी अटक केली होती. शनिवारी या लोकांची पोलिस कोठडी वाढवण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news