Kanchanjungha Express accident| कांचनजंगा एक्सप्रेस अपघातातील मृतांची संख्या ८ वर

Kanchanjungha Express accident
Kanchanjungha Express accident

पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या ८ वर पहोचली आहे तर ३० जण जखमी झाल्याचे पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी 'ANI'शी बोलताना सांगितले. (Kanchanjungha Express accident)

या भीषण रेल्वे अपघातात मालगाडीचा चालक आणि सहाय्यक चालक आणि कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या गार्डचा मृत्यू झाला आहे," असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले आहे.

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली. रंगा पाणी आणि निजबारीजवळ झालेल्या अपघातात तीन बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे पथकाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर बंगालच्या न्यू जलपाईगुडी स्टेशनपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "आतापर्यंत या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३० जण जखमी झाले आहेत."

मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत

पश्चिम बंगालमधील भीषण रेल्वे अपघातातील ८ मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (Uttarakhand accident) देण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाने 'X' पोस्ट करून सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news