धोकेबाज…; करण कुंद्रा- तेजस्वी प्रकाशचा ब्रेकअप? | पुढारी

धोकेबाज...; करण कुंद्रा- तेजस्वी प्रकाशचा ब्रेकअप?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बिग बॉस १५’ फेम करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपलपैकी एक आहे. बिग बॉसच्या सेटवर पहिल्यांदा दोघेजण एकमेकांना भेटले आणि त्याच्या डेटिंगच्या चर्चा रंगू लागल्या. हा शो संपल्यावर तेजस्वी आणि करणने एकमेंकांना डेट करत असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून हे कपल त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले आहेत. आता मात्र, याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश दोघांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, तेजस्वी आणि करण कुंद्रा याच्या रिलेशनशीपमध्ये काही दिवसांपासून अडचण निर्माण झाली आहे. यावेळी दोघांच्या ओळखीच्या मैत्रिणींमुळे प्रॉब्लेम झाला असल्याचे बोलले जात आहे. यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असली तरी तेजस्वी आणि करण कुंद्रा यांनी त्याच्या रिलेशनशीपची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही. यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.

हा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. दरम्यान एका युजर्सने लिहिले आहे की, मला ते दोघं आवडत नाहीत, पण दोघांचं ब्रेकअप झालं आहे असं मला वाटत नाही. दुसऱ्या एका युजर्सने लिहिले आहे की, करण तेजस्वीचा दिवाना आहे आणि तेजस्वी तिचे वैयक्तिक आयुष्य फारसे सार्वजनिकरित्या सगळ्यांना सांगत नाही. आणि तिसऱ्या एका युजर्सने करण कुंद्राला ‘सीरियल चीटर’,‘धोकेबाज’ म्हटले आहे. याशिवाय ब्रेकअपनंतरही अर्जुन कपूर आणि मलायका अरोरासोबत करण आणि तेजस्वी एकत्र दिसतील आणि त्यांच्यात सर्व काही ठीक होईल असे म्हटलं आहे.

हेही वाचा 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

Back to top button