नवाजुद्दीन सिद्धिकीच्या ‘रौतू का राज’चा ट्रेलर रिलीज, स्मार्ट पोलिस करणार गूढ खुनाचा तपास

नवाजुद्दीन सिद्धिकी
नवाजुद्दीन सिद्धिकी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आनंद सुरापूर दिग्दर्शित 'रौतू का राज'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी इन्स्पेक्टर दीपक नेगीच्या मुख्य भूमिकेत झळकेल. झी स्टुडिओज आणि फाट फिश रेकॉर्ड्स निर्मित या रहस्यमय थरारपटात राजेश कुमार, अतुल तिवारी आणि नारायणी शास्त्री यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. हे कथानक उत्तराखंडमधील रौतू की बेली या नयनरम्य गावावर आधारित आहे. मागील वर्षी ५४ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) या सिनेमाचा गाला प्रीमियर झाला होता. आता २८ जून रोजी ओटीटी प्रीमीअरसाठी सज्ज आहे. दीड दशकाहून अधिक काळापासून खुनाची एकही घटना न अनुभवलेल्या रौतू की बेली येथील अंध शाळेतील वॉर्डनच्या रहस्यमय मृत्यूने ग्लानीत असलेले गाव हादरते. या खुनाभोवती कथानक फिरते.

अधिक वाचा –

येथेच एसएचओ दीपक नेगी उर्फ नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या टीमचा प्रवेश होतो. कारण त्यांना या दुर्मिळ आणि हाय-प्रोफाइल हत्येचा तपास सोडवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या सिनेमात एसएचओ दीपक नेगी (नवाजुद्दीनने साकारलेली भूमिका) आणि उपनिरीक्षक डिमरी (राजेश कुमारने साकारलेली भूमिका) यांच्यातील एक आगळीवेगळी तसेच आनंदी मैत्री दाखवण्यात आली आहे. या खुनाची उकल करण्याची जबाबदारी दोघांवर असल्याने आळशी अवस्थेतून बाहेर यावे लागते.

अधिक वाचा –

दिग्दर्शक आणि निर्माते आनंद सुरापूर म्हणाले, "रौतू का राज ही एक छोट्या शहरातील कथा आहे. या कथानकात प्रेक्षकांना उत्तराखंड आणि त्याच्या आसपासच्या भागातील चित्तथरारक दृश्य दिसते. सिनेमातील आश्चर्यकारक दृश्ये, आकर्षक कथनासह, सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक गुंतून राहील. वास्तविक हा सिनेमा इतर गूढ थरारपटांपेक्षा वेगळा ठरतो".

अधिक वाचा –

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "मला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलं नाट्य पाहण्याची आवड आहे. उत्तराखंडची विचित्र पात्रे, आळशीपणा; पण श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पार्श्वभूमीमुळे 'रौतू का राज़' हटके ठरतो. ट्रेलरमध्ये सिनेमाच्या रहस्यमय कथानकाची झलक दिसते. त्यातून सिनेमाच्या यूएसपीवर प्रकाश पडतो. एक हुशार पोलिस आळशी हत्येचा तपास कसा उलगडतो याची ही कथा आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news