हमारे बारह फेम अदिती धीमन| ‘मला बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या..’

Hamare Baarah Movie fame Aditi Dhiman
Hamare Baarah Movie fame Aditi Dhiman

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमारे बारह चित्रपटात अन्नु कपूरची मुलगी जरीनची भूमिका अदिती साकारली आहे. अदिती धीमन सध्या खूप चर्चेत आली आहे. हा चित्रपट वादग्रस्त ठरला आहे. दुसरीकडे अदितीला बलात्काराच्या आणि जीवे मारण्याची धमकी मिळत आहेत. ही परिस्थिती इतकी कठीण होती की, माझे कुटुंबीय घाबरले होते. हा माझा डेब्यू चित्रपट होता. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर हा चित्रपट मिळाला होता, असे अदितीने एका मुलाखतीत सांगितले. अदितीने आपल्या स्ट्रगल पीरियडवर बातचीत केली.

अधिक वाचा –

कुटुंबीयांनी वापस बोलावलं…

अदितीने आधी आपले कुटुंबीय धमक्यांनी घाबरल्याचे म्हटले होते. त्यांनी अदितीला वापस घरी बोलावले. ती घरी निघून गेली. अदिती म्हणाली, त्यांना बातम्यांमधून समजले होते की, मला नको त्या धमक्या मिळत आहेत. घरच्यांनी मला फोन केला आणि घरी बोलवलं. मी आईला म्हणाले की, मी काही चुकीचं केलेलं नाहीत मी का घाबरू. तुझ्या मुलीने चुकीचे काही केलेलं नाही तर तूदेखील घाबरू नकोस. मम्मा, तू एक फायटरची पत्नी राहिलीस. पण हा विचार करा की, ग्राउंड लेव्हलचं सत्य दाखवणे किती गरजेचे आहे.

अधिक वाचा –

अदितीच्या वडिलांच्या निधनानंतर एका स्पर्धेने बदललं आयुष्य

हमारे बारह फेम अदिती बंगळुरुची आहे. तिला सुरुवातीपासूनचं अभिनेत्री व्हायचं होतं. तिचे वडील हवाई दलात होते. त्यांच्या निधनावेळी अदिती ११ वर्षांची होते. ती म्हणाली, मला कधी वाटलं देखील नव्हतं की, मी कधी अभिनय करू शकेन. मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. मी बी.कॉम करत होते. एक स्पर्धा झाली होती -फ्रेश फेसची. त्यामध्ये मी सहभाग घेतला. मी स्पर्धा जिंकली. माझ्या फ्रेंडने माझं नाव दिलं होतं. मला माहितीही नव्हतं. माझी मुलाखत झाली. माझ्याबद्दल लेख आला आणि माझ्या आई आणि भावाने पाहिल्यानंतर ते म्हणाले, तुला काहीतरी करायला हवं. तुझ्याकडे ती क्षमता आहे.

अधिक वाचा –

मी अनुपम खेर सर यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथून शिकले की, कॅमेरा वर्क कसा होतो. दरम्यान, एका म्युझिक व्हिडिओ 'पिया जी' केला. मग सावधान इंडियाचा एपिसोड केला. मी अनेक छोटे-छोटे काम केले. कलर्सच्या सावी की सवारी मालिकेतही छोटी भूमिका केली होती. हमारे बारहमध्ये भूमिका केली.

सुंदर असल्यामुळे रिजेक्शन

अदितीने सांगितले की, सुंदर अशल्यामुळे अनेकदा ऑडिशन देऊन देखील रिजेक्टशन झेलावं लागलं. अनेकदा हे सांगून रिजेक्ट करण्यात आलं की, मुख्य अभिनेत्रीपेक्षाही तू सुंदर आहेस. अनेकदा क्यूट फेस असतानाही कामे मिळत नसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Dhiman (@aditidhiman11)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news